Uncategorized

ग्रा.पं.निवडणूक प्रचारातून ‘विकास’ गायब!

विरोधकांना वाईट ठरविण्यावरच सर्वांचा भर

जातीय समीकरणांवरच सर्वांची भिस्त


शिरपूर
दि.15 जाने रोजी होणाऱ्या ग्रा.प.निवडणूकांसाठी प्रचारांच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली आहे.सर्वच गटा-तटाचे व पॕनलचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदार राजाचे उंबरठे झिजवत आहेत.निवडणूकीचा प्रचार करताना आपला विरोधक कसा वाईट आहे, हे मतदारांना पटवून देण्यातच बहूतांश उमेदवार आपली शक्ती खर्ची घालत आहेत.निवडणूक प्रचारात एकमेंकांचे उणे-दूणे काढले जात आहे.त्यामुळे यावेळेसच्या ग्रामपंचायत निवडणूकीतून शहराच्या विकासाचा मुद्दाच गायब झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शिरपूर जैन ही वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.सोबतच शिरपूर जैन हे शहर देश पातळीवरील अत्यंत महत्वाचे असे पर्यटन स्थळ सुद्धा आहे.मात्र शहरात किमान सुविधा सुद्धा अस्तित्वात नाहीत.हे कटू असले तरी वास्तव आहे.शहरातील विविध रस्त्यांची झालेली दुरावस्था,तुंबलेल्या सांडपाण्याच्या नाल्या,शहराच्या विविध भागात रात्रीला असणारा अंधार, आठवडी बाजारात पसरलेले घाणीचे साम्राज्य,शासकीय जागांवर बोकाळलेले अतिक्रमण,क्रिडा संकूलाची दुरावस्था,शाळा व अंगणवाड्या जवळ साठलेला कचरा इत्यादी समस्या तर आहेतच.सोबतच पोलीस स्टेशन समोर,जैन मंदीर जवळ,महाराणा प्रताप चौकात,गुजरी चौकात व बसवेश्वर चौकात रस्त्याच्या मधोमध पडलेली भगदाडे ही शहरातील राजकारण्यांच्या नाकर्तेपणाचे पुरावे म्हणून आजही बघायला मिळतात.बाहेरगावी जाताना बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बसायला हक्काची जागा नाही.अतिक्रमण हटाव मोहीमेत जमिनदोस्त करण्यात आलेला प्रवाशी निवारा परत नव्याने बांधण्यात आलेला नाही.प्रवाशांना लघूशंका करण्यासाठी संडास मुतारी तर सोडा साधा अडोसा सुद्धा बस स्टँड परीसरात नाही.मनात येईल तिथे लोक लघवीला जात असल्याने बस स्टँड परीसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.कोंडवाड्याची दुरावस्था झाली आहे.शहराच्या व सामान्य जनतेच्या अशा भरपूर समस्या आहेत.मायबाप जनतेला शहराच्या विकासाबाबत खूप अपेक्षा आहेत.परंतू ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारातून ‘विकास’ कधीचाच गायब झाला आहे.आपले प्रतिस्पर्धी नेते कसे वाईट आहेत,हे मतदारांना पटवून देण्यातच सर्वच नेते आपली शक्ती खर्ची घालत आहेत.त्यामुळे जनतेत नाराजीची लाट पसरली आहे.

अधिकाऱ्यांच्या मागे मागे फिरणाऱ्या अडाणी उमेदवारापेक्षा अधिकाऱ्यांना वठणीवर आणणारा सुशिक्षित, समजदार उमेदवार निवडण्यावर जनता भर देणार आहे.सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने दिलेला पैसा जनविकासाच्या कामासाठीच खर्च करणारा नेता जनतेला हवा आहे.स्वतःचे घर भरणारा उमेदवार जनता नाकारणार आहे.सोबतच शहराच्या समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेणारा किंवा विकास कामांची हमी देणारा,शहराची सर्वधर्म समभावाची व एकतेची ओळख अबाधित ठेवणारा, युवकांना भांडण-तंट्यांपासून परावृत्त करणारा, तरुणांना निर्व्यसनी ठेवून व्यायामाची आवड लावणारा,शहरात शांतता ठेवण्यासाठी पुढाकार घेणारा उमेदवारच आम्ही निवडणून देणार आहोत.असे अनेक मतदारांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close