ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

गौळखेड रस्त्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? ग्रामस्थानचा रास्त सवाल

गौळखेडा रस्त्याची पावसाळ्यातील परिस्थिती…..

संदीपराव देशमुख

जिल्हा प्रतिनिधी active news networtk

शिरपूर पासून चार किलोमीटर असलेल्या गौळखेड रस्त्याची अत्यंत दैनीय अवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय पुढाऱ्यांचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
शिरपूर पासून जवळ असलेले गौरखेडा हे चारशे लोकवस्तीचे गाव आहे.तर 250 मतदार आहेत.
रस्ते ही मानवाची मूलभूत गरज मानली जाते ,शासनाच्या वतीने नॅशनल हायवे बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्याउलट ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कित्येक वर्षापासून राजकीय पुढाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.मात्र येथील मतदान घेऊन आपली राजकिय पोळी भाजण्यात यशस्वी झाले आहेत. गत कित्येक वर्षांपासून बांधकाम विभागाने सदर रस्त्याची डागडुजी सुद्धा केली नाही. लोकप्रतिनिधींनी निव्वळ मतांचे राजकारण करून, या गावास मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यास हेतुपुरस्सर बाजूला सारले आहे.असे ग्रामस्थांच्या वतीने बोलले जात आहे .
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सदर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे मात्र अजूनही या कामाला मोहरत मिळेना राजकीय नेते फक्त निवडणुकी च्या काळात गावात येतात नंतर कुणीही गावाच्या समस्याबाबत विचार करत नाही
पावसाळ्यामध्ये तर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणतेही वाहन या रस्त्यावरून जात नसल्याने विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.गौळखेड येथील वर्ग एक ते चार च्या नंतर चे सर्व विद्यार्थी शिरपूर येथे शिक्षणासाठी जातात तसेच शिरपूर येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना भाजीपाला, दूध ,शेतमालाची नेआण या रस्त्याने करावी लागते शेतमाल वेळेवर न पोहचल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . येथील नागरिकांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी व बाजारहाटसाठी शिरपूरला जाण्याशिवाय पर्याय नाही, पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरील चिखल तुडवत जावे लागते तर इतर वेळी रस्त्यावर दगड,धोंडे,गड्डे पडलेले असल्याने वाहन जाऊ शकत नाही. नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागास तोंडी व लेखी निवेदने देऊन कळवले आहे .परंतु प्रशासनाच्या वतीने अद्याप पर्यंत रस्त्याचे काम करण्यात आलेली नाही प्रशासनाने त्वरित रस्त्याच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी होत आहे .

गौळखेडा गावाकडे राजकीय पुढाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. निवडणुका आल्यावरच पुढारी गावात येतात परंतु गावाच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. शिरपूर ते गौळखेड रस्ता मंजूर झाला असून त्वरित काम सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल
डिगंबर चंद्रशेखर- वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .