गोपाल वाढे यांची अ.भा.मराठी पत्रकार परीषदेच्या शहराध्यपदी अविरोध निवड

उपाध्यक्ष-शेख सुलतान तर सचिवपदी गजानन देशमुख

शिरपूर ता 6 जानेवारी
पत्रकार दिनाचे औचित्य साधून काल दि.६ रोजी अ.भा.मराठी पत्रकार परीषदेच्या सर्व सभासदांची एक सभा संपन्न झाली.या सभेत अ.भा.मराठी पत्रकार परीषदेच्या शहर कार्यकारीणीचे पुनर्गठण करण्यात आले.पत्रकार परीषदेच्या सर्व सभासदांनी सर्वानुमते गोपाल वाढे यांची अध्यक्षपदी तर शेख सुलतान यांची उपाध्यक्षपदी व गजानन देशमुख यांची सचिवपदी सर्वानुमते निवड केली.
दि.६ जाने.1832ला दर्पण नावाचे मराठीतील पहिल्या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकर यांनि रोवली होती म्हणून 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरी केला जातो. शिरपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून ६ जाने.ला पत्रकार दिन साजरा केला जातो.काल याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील पत्रकार एकत्र आले.तसेच सालाबाद प्रमाणे अ.भा.मराठी पत्रकार परीषदेच्या शहर कार्यकारीणीचे यावेळी पुनर्गठण देखील करण्यात आले.पत्रकार परीषदेच्या सभासदांनी याप्रसंगी गोपाल वाढे यांची शहराध्यक्षपदी तर शेख सुलतान यांची उपाध्यक्षपदी व गजानन देशमुख यांची सचिवपदी सर्वानुमते निवड केली.

प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाते. प्रसारमाध्यमांची समाजातील ही प्रतिमा कायम ठेवणे.तसेच पत्रकारीतेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणार असल्याचे गोपाल वाढे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांनी जांभेकरांना अभिवादन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले.प्रास्ताविक कैलास भालेराव,असलम पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकांत देशमुख यांनी केले.या कार्यक्रमासाठी कैलास भालेराव,शशीकांत देशमुख,अस्लमखाँ पठाण,गजानन देशमुख,शेख सुलतान, गोपाल वाढे,संदीप देशमुख,कपील भालेराव,किशोर देशमुख,विलास गावंडे व संदीप गावंडे इत्यादी पत्रकार आवर्जुन उपस्थित होते.