उमरखेड ते इसापूर संध्याकाळ सात ची बस चालू करण्यात यावी…. प्रवाशांची मागणी..
अॅक्टीव न्युज उमरखेड तालुका प्रतिनिधी गजानन वानखेडे.दिं.२२.०१.२०२०.मो.९०९६७४६५१८……………….ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी ऊमरखेड येथे तालुक्याच्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नियमित जातात, हिवाळ्यात दिवस लवकर मावळतो,दिवसभर वेळ केव्हा निघून गेली कळत नाही, अंधारात खाजगी वाहने लवकर निघून जातात,अशा वेळी प्रवाशांची धावपळ उडते.सायंकाळची सात वाजता ची बस ऊमरखेड ते इसापूर नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी मुळावा येथील प्रगतशील शेतकरी विजूभाऊ गणेश चव्हाण यांनी केली असता मुळावा येथील माजी अर्थ व बांधकाम सभापती तातूभाऊ देशमुख यांनी ऊमरखेड बसस्थानक डेपो व्यवस्थापक नाटकर यांच्याशी आज मोबाईल वर संपर्क करुन ऊमरखेड ते इसापूर संध्याकाळ सात वाजता ची बस चालू करण्यात यावी अशी मागणी केली.त्वरीत बस नियमित चालू झाल्यास प्रवाशांच्या तिकीट पासून एसटी महामंडळ चे आर्थिक तिजोरीत रक्कम जमा होईल व महामंडळ बस नियमित नफा मिळेल.बस चालू झाल्यास प्रवाशी सुद्धा आनंदीत होतील.#गजानन वानखेडे.