अत्यंत महत्वाचे… जानगीर महाराज संस्थानवरील शिवगीर बाबा पुण्यतिथीचा महाप्रसाद रद्द असल्याची घोषणा…

प्रतीनिधी/ शिरपूर
सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी होणारा महाप्रसाद यावर्षी कोरोणा या जागतिक महामारीच्या अनुषंगाने रद्ध करण्यात आल्याची घोषणा संस्थान कडून करण्यात आली.
संस्थान कडून भाविकांसाठी पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे.
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की,
आपणाकडे पीठ पोहोचले असेलच.त्या पिठाच्या पोळ्या बनवून दरवर्षीच्या ठरलेल्या जागेवर त्या पोळ्या जमा कराव्यात.त्या ठरलेल्या ठिकाणी उद्या दिनांक २८ रोजी संस्थानच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भाजी पोहोचवण्यात येईल. अशाप्रकारे सर्वांना घरपोच प्रसाद पोहोचवण्याची व्यवस्था संस्थानच्यावतीने करण्यात आली आहे. याची सर्वां भाविकांनी नोंद घ्यावी.
गावातील आणि परगावातील कोणत्याही भाविक भक्तांनी संस्थानवर पोळ्या घेऊन किंवा प्रसाद घेण्यासाठी येऊ नये. संस्थानवर येऊन गर्दी करु नये. ही विनंती.
आदेशावरुन
श्री.जानगीर महाराज संस्थान
शिरपूर जैन