Uncategorized

हिवाळ्यातील कलिंगड पिक घेतल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी झाला हवालदिल

शिरपूर ( प्रतिनिधी ):- मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात ३ ते ४ वर्षापासून हळदी ,भाजीपाला ,पाठोपाठ कलिंगडाची शेती शेतकरी मोठ्या प्रमाणात करु लागला .परंतु या बेमौसम लागवड केल्याने कलिंगड ची शेती ही नुकसानीची ठरली असून आजवर केलेला खर्चसुद्धा वसूल होणार नाही. गिराईक त्याकडे पाठ दाखवत आहे .
सप्टेंबर 2020 या दरम्यान शिरपूर जैन परिसरात काही शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवड केली . कलिंगड हे नव्याने लागवड केल्यास पेरणीपासून ते काढणीपर्यंत एकरी 90 ते 95 हजार पर्यंत खर्च येतो. हे पीक 65 ते 90 दिवस या कालावधीत काढणीला येते .प्रामुख्याने वाशिम ,मालेगाव ,अकोला व आजूबाजूच्या मार्केटला बाजारपेठेत जातात तर उन्हाळ्यातील कलिंगड दिल्ली, बेंगलोर सारख्या बाजारपेठेत जातात. शिरपूर जैन परिसरात 40 ते 45 एकर कलिंगडची लागवड झाली होती .त्यावेळी 15 ते 20 टनांचे उत्पादन मिळाले. परंतु हे कलिंगड बेमोसमात लावल्याने गिराईक त्याकडे फिरकुन सुद्धा बघत नसल्याने आज रोजी केलेला खर्च पूर्ण वाया गेला आहे .मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची मागणी कुठेच दिसून येत नाही. हे कलिंगड शेतातच सध्या पडून आहेत .त्यामुळे हिवाळ्यात कलिंगड पिक नुकसानी ची ठरत असल्याची भावना लागवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बे मोसमात कलिंगड लागवड केल्याने योग्य भाव मिळत नसून आजच्या मार्केट मध्ये गिऱ्हाईक विकत घेत नसल्याने या लागवडिवर केलेला खर्च पूर्ण दावा गेला . हे कलिंगड फेकून द्यायची वेळ आली आहे .
विजय प्रभाकर गाडे
कलिंगड उत्पादक
शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close