Uncategorized

वीरशैव लिंगायत समाज च्या वतीने अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन

शिरपूर जैन ( प्रतिनिधी ): येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने श्री. ष.ब्र. 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या प्रेरणेने व पावन सानिध्यात अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन 23 /12 /2020 पासून जगद्गुरु दारूकाचार्य मठ शिरपूर येथे करण्यात आले आहे. मानवांच्या उद्धारासाठी कलियुगात नामस्मरण या सारखे दुसरे साधन नाही. नामस्मरणाचे स्वरूप ,प्रयोजन व परिणाम लक्षात आणून देणारा उपक्रम म्हणजे अखंड शिवनाम सप्ताह म्हणून श्री ष.ब्र.१०८ वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन मार्गशीर्ष शुक्लपक्ष ९ बुधवार दि. 23/12 /2020 पासून करण्यात आले आहे .या सप्ताहतील दैनंदिन कार्यक्रम म्हणून सकाळी ६ ते ७ शिवपाठ, ७ ते ११ लक्ष्मण गाथा व परमरहस्य ग्रंथ पारायण नंतर उपस्थित शिवाचार्य प्रवचन, ४ ते ५ गाथा व भजन ,८ ते १० शिव कीर्तन व नंतर शिवभक्त व भक्ती असा आहे. तर गाथा पारायण वाचक श्री शिवभक्त पारायण बबन आप्पा कौसडीकर, तर अभिषेक पुजारी निरंजन स्वामी दंडगे हे आहेत. श्री संत सावता माळी भजनी मंडळ, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ ,श्री जगदंबा भजनी मंडळ ,श्री खंडोबा भजनी मंडळ, श्री निवृत्तीनाथ भजनी मंडळ व परिसरातील सर्व भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. या अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता दिनांक 30 /12 /2020 रोजी दुपारी एक वाजता श्री शिवभक्त पारायण भूषण स्वामी वसमत कीर्तनकार यांच्या कीर्तनाने होणार असून नंतर महाप्रसादाचा सुरुवात होईल.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close