Uncategorized

जेतवन नगर वाघी “बु” येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित समता सैनिक दलाच्या शाखेचे उद्घाटन

जेतवन नगर वाघी “बु” येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित समता सैनिक दलाच्या शाखेचे उद्घाटन 22/12/2020 रोजी करण्यात आले उद्घाटनाला वाशिम जिल्ह्याचे समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष सहाय्यक उपनिरीक्षक मेजर अश्विन खिल्लारे, मेजर मोरे सर तसेच थोर विचारवंत शिंदे सर उपस्थित होते थोर विचारवंत शिंदे सर आणि मेजर मोरे सरांनी निळ्या रंगाची रेबिन कापून शाखेचे उद्घाटन केले उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष सहाय्यक उपनिरीक्षक अश्विन मेजर खिल्लारे यांनी समता सैनिक दलाचे महत्त्वाचे कार्य व कार्यशैली समजून सांगितली समता सैनिक दलाचा सैनिक हा सुदृढ,बलवान,शिस्तप्रिय,रुबाबदार,कनखर,स्वाभिमानी, त्यागी,शीलवान निर्व्यसनी,सहनशील व सर्वांचा आदर करणारा असावा असे त्यांनी सांगितले जेतवन नगर वाघी “बु” येथील समता सैनिक दलाच्या नवीन सैनिकाचे तीन दिवसाचे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण पणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सैनिक देऊ असे त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले.
त्यानंतर थोर विचारवंत शिंदे सर यांनी मार्गदर्शन करत असताना समता सैनिक दलाची आजची गरज आणि त्यावेळेस समता सैनिक दला ची जबाबदारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संरक्षण कशा प्रकारे केली याची माहिती दिली त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती गावकरी मंडळींना दिली तर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मान्यताप्राप्त संस्थेची शाखा उघडताना कोणाच्याही बापाला विचारण्याची गरज नाही असे शिंदे सरांनी सांगितले
– संघटक:- महेंद्र खिल्लारे 7774889809

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close