Uncategorized

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. …डॉ.हेमंत देशमुख यांच्या बांधावर

मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतातील नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी


वाशिम, दि. २५ (जिमाका) : आपल्या शेतीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक शेती करणाऱ्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत या प्रकल्पांची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी गुरुवार, २४ डिसेंबर रोजी पाहणी केली. तसेच या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, मालेगावचे तालुका कृषि अधिकारी शशिकीरण जांभरुणकर, तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ, मंडळ कृषि अधिकारी विलास वाघ, लक्ष्मण सावंत, कृषि सहाय्यक देवानंद रणवीर, रतन बर्वे, अजय चव्हाण, गणेश ठोकळ, जगन शिंदे, रामदास मानवतकर आदी उपस्थित होते.


मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी हेमंत देशमुख यांच्या प्रक्षेत्रास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी भेट दिली. याठिकाणी श्री. देशमुख ह्यांच्या शेतीमधील पपई, केळी, मिरची,कांदा पिकाची तसेच शेततळे व ऑटोमायझेशन ठिबक संचाची पाहणी केली.
घाटा येथील गजानन निवृत्ती दाभाडे ह्यांच्या शेडनेटमधील मिरची बीजोत्पादन, बबन तुकाराम कुटे ह्यांच्या शेतातील मिरची बीजोत्पादन व मल्चिंगसह शेततळे आदी बाबींची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच यामाध्यमातून मिळणारे उत्पादन, येणारा खर्च आदी बाबींची माहिती घेतली.
शेलगाव बोंदाडे येथील उमेश वाजुळकर यांच्या विदर्भ फार्मर प्रोड्युसर कंपनी व अवजारे बँकेची व अमानी येथील महिला बचत गटाच्या उद्योगाची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी पाहणी केली

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close