घराच्या फेरफारासाठी ३ हजाराची लाच स्विकारतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

अॅक्टीव न्युज गजानन वानखेडे तालुका प्रतिनिधी उमरखेड .दिं.३०.१२.२०२०.मो.९०९६७४६५१८.
घर नावाने करून गांव नमुना आठ देण्यासाठी सुकळी (ज ) येथील ग्रामसेवकाने ८ हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर उर्वरित ३ हजार रूपयाची लाच स्विकारतांना आज २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताचे सुमारास पंचायत समोरिल चहा कॅन्टीनवर लाचखोर ग्रामसेवक अमोल चव्हाण यास यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले .
याबाबत सविस्तर असे की , सुकळी (ज)फिर्यादी संतोष रेवजी वानखेडे यांनी येथील ग्रामसेवक अमोल चव्हाण यांच्याकडे घराच्या फेरफार करून देण्याबाबत रितसर अर्ज केला असतांना त्यांना सदर ग्रामसेवकाने ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती . त्यांनी ५ हजार रुपये अगोदर दिले होते .परंतू ठरल्याप्रमाणे बाकीचे ३ हजार रुपये दिल्याशिवाय गाव नमुना ८ मिळणार नाही असे ग्रामसेवकाने सांगीतल्यानंतर त्रस्त झालेल्या संतोष वानखेडे यांनी यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली असता आज २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एसीबीच्या पथकाने त्यास ३ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले .
या कामी यवतमाळ ए सी बी विभागाचे पो अधिक्षक विशाल गायकवाड , अप पो अधिक्षक गजानन पडघम , पो उप अधिक्षक राजेश मुळे , पो नि ज्ञानेश्वर नालट , किरण खेडकर , अब्दुल वशीम, सुधीर काबंळे ,महेश वाकोडे , सचीन भोयर ,राहुल गेडाम सापळा कर्मचारी होते.
#गजानन वानखेडे.