Video :आम्ही पर्यायी सरकार देण्यास कधीही तयार: फडणवीस
Devendra Fadnavis Press Conference in Pune माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये महा आघाडी सरकारवर निशाणा साधला. पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी, विज बिल या मुद्यांवरुन त्यांनी सरकारवर टीका केली.
सरकारने वर्षपूर्तीनंतरही काहीच काम केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसून सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असा पुनरउच्चार त्यांनी यावेळी केला. सरकार पडेल याकडे आम्ही डोळे लावून बसलेलो नाही. पण ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देण्यास सक्षम असून असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
-पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीनंतर केलेली नुकसान भरपाई मिळालेलनी नाही
– पंचनामे झालेले नाहीत
-वीजेच्या सवलतीसंदर्भात घूमजाव केलाय
-सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही
-कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनताही भरडली जात आहे
-सरकारचं एक वर्ष पूर्ण होईल पण सरकारचं कुठलंच काम पहायला मिळत नाही
-सरकारचे प्रयत्न , खरेदींमध्ये भ्रष्टाचार या गोष्टी पुढे येतायत
– सरकारबद्दल नागरिकांमध्ये असलेला असंतोष नक्कीच विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये दिसेल
Media interaction in Pune https://t.co/AqUvDxfOxK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 25, 2020