Kartiki Ekadashi: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठुरायाला साकडे (VIDEO)
पंढरपूर : कोरोनावर लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन जगावर असलेले महाभयंकर रोगाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी विठुरायाला घातले. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढऱपूरमधील श्रीविठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाली.
यावेळी त्यांच्या समवेत पार्थ आणि जय हेही होते. पुजेला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे सपत्निक उपस्थित होते. पवार म्हणाले, सध्या जगावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वच यात्रांवर सरकारला निर्बंध घालावे लागले. मात्र, त्यामागे जनतेची सुरक्षा एकमेव उद्देश आहे. मागील आषाढी वारी आणि कार्तिकी वारीमध्ये वारकरी संप्रदायाने अतिशय़ संयमी आणि महत्वाची भूमिका घेतली. त्यामुळेच या काळातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली. वारकरी संप्रदायामधील शिस्त आणि संयम यानिमित्ताने पाहायला मिळाला.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले पाहिजे. आषाढी वारीला कमी संख्येने वारक-यांना यावे लागले. वारक-यांना घरातूनच दर्शन घ्यावे लागले. कोरोनाच्या काळात केंद्र तसेच राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना राज्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपल्या सर्वांना एकजुटीने कोरोनाचे संकटावर मात करावी लागणार आहे. कारण लॅाकडाउन करण्याने सर्वसामान्यांचे तसेच बारा बलुतेदारांची हानी होते. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होते. मागील लॅाकडाऊनच्या काळात सरकारच्या वतीने धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या काळात सर्वांनीच काळजी घ्यावी. जगावर, देशावर, राज्यावर जे संकट आले आहे.
राज्यात सध्या शेतक-य़ांवर मोठी संकटे आली. शेतक-य़ांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्याला चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचे बळ पांडुरंगाने द्यावे, असे साकडेही मी महापुजेच्या निमित्ताने पांडुरंगाला घातले.
आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांनी पाच कोटीचा निधी जाहीर केला होता. त्याचा प्रत्यक्ष निधी पंढरपूर प्रशासनाला निधी मिळाला नव्हता. मात्र, अर्थमंत्री या नात्याने तो निधी पंढरपूर प्रशासनाला दिला आहे.
पंढऱपूर घाटाची भिंत कोसळली तेव्हा मी पाहणी केली होती. सरकारी काम करताना दर्जा राहत नसल्याचे दिसून आले. ज्या ठेकेदार आणि आधिका-यांची जबाबदार आहे, त्याची चौकशीचे आदेश मी दिले आहेत. पाहणीनंतर मला कोरोना झाल्यामुळे त्याकडे लक्ष देता आले नाही. कोरोनामुळे सरकारकडे येणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे असणारा निधी योग्य रित्या कसा वापरला येईल, यासाठी अधिका-यांनी प्रय़त्न करावेत, असेही पवार यांनी सांगितले.
Source link