Uncategorized

CTET 2020: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर; राज्यात नाही एकही नवे केंद्र

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे (सीबीएससी) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ३१ जानेवारी २०२१ रोजी देशातील १३५ शहरांमध्ये होणार असल्याचे बुधवारी (ता.४) 'सीबीएससी'ने स्पष्ट केले आहे. 

ही परीक्षा यापूर्वी ५ जुलै रोजी ११२ शहरात होणार होती, पण कोरोना'मुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, अनेक विद्यार्थांना कोरोना'मुळे प्रवास करता येणार नसल्याने त्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार ७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा केंद्र बदलण्यासाठी www.ctet.nic.in या संकेतस्थळावर लाॅगइन करावे.

– यंदा आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार; आरोग्यमंत्र्यांनी दिलं गिफ्ट

'कोरोना'मुळे सीबीएससीने देशातील ११२ ऐवजी १३५ शहरांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रात एकही नवे केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)




Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close