हिरंगी येथे बालसंस्कार शिबीर संपन्न-महेंद्र सावके

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक..22/11/2020.…….प्रतिनीधी
चोरद येथून जवळच असलेल्या हिरंगी येथे रुग्णसेवा युवा ग्रुप तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या अनुषंगाने शुक्रवारी(ता.20) रोजी बालसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.उपस्थित मान्यवरांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,वैराग्यमूर्ती गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.या शिबिरामध्ये हिरंगी येथील 10 ते 15 वर्ष वयोगतील 40 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. शिबिराच्या समारोपा मध्ये विद्यार्थ्यांनि आपण शिबिरामध्ये काय शिकलो याचे प्रात्यक्षिक करून दाखविले .तसेच या कार्यक्रमाला हिरंगी येथील महिला पुरुष मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तपोमूर्ती ह.भ.प.कैलास महाराज येवले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हिरंगीचे मुख्याध्यापक दीपक येवले जिल्हा सेवा अधिकारी रवींद्र वार्डेकर,डॉ सुनील सपकाळ,कीर्तनकार प्रा.शाम वानखडे ,प्रा गजानन.इंगळे, मयुर इंगळे ,सर्पमित्र आदित्य इंगोले, सतीष गावंडे,डॉ आडोळे, डॉ सौ महिंद्रा आडोळे ,रुग्णसेवा युवा ग्रुपचे शुभम डोफेकर,गावरगुरु सर,यांच्यासह प.सुधाकर क्षीरसागर,उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष तपोमूर्ती ह.भ.प. कैलास महाराज येवले यांचे अध्यक्षणीय भाषण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे हिरंगी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.बालसंस्कार शिबीर गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तथा प्रशासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालण करुन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.”बाल संस्कार शिबीराचे” समरोप प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेंद्र सावके यांनी केले आहे.याबाबतची माहिती महेंद्र सावके यांनी आज (रविवारी) दिली आहे.