हलक्या पावसाची राज्यामध्ये शक्यता
पुणे – बंगाल उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्याची तीव्रता येत्या मंगळवारपर्यंत (ता. २४) आणखी वाढणार असून, वारे वायव्येच्या दिशेकडे असलेल्या तमिळनाडू व पुद्दुचेरी आणि मल्लापुरम या भागाकडे सरकणार आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होणार आहे. यामुळे या भागात येत्या बुधवारपासून (ता. २५) तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. राज्यात हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असली तरी काही भागात अजूनही चढउतार सुरू आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, पुणे शहरात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४.१ अंश सेल्सिअसने वाढून १७.५ अंश सेल्सिअस नोंदले. लोहगाव येथे १८.७ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली असून शहरात थंडी कमी झाली आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Source link