स्वाधार योजनेचे उर्वरीत ६५ कोटी द्या!
मनवर यांचे ना.मुंडे यांना निवेदन
वित्त विभागाची लवकरच मिळणार मंजूरी
मंगरूळपीर:- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या उर्वरीत विद्यार्थ्याची परतावा रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी राहुलदेव मनवर यांनी सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागात मंजूरीकरीता अंतीम टप्प्यात आहे.
दि.१७ रोजी मनवर यांनी पाठवीलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दि. १३ मे रोजी अमरावती विभागीय उपायुक्त यांना सत्र २०१९-२० च्या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या राज्यभरातील लाभार्थ्यांकरीता निधी पाठविण्याबाबत निवेदन दिले होते. त्यावर त्यांनी आयुक्त समाज कल्याण पुणे यांना पत्र पाठवीले होते. तसेच मा.सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन पाठवीले होते. याचा पाठपुरावा केला होता. मात्र शासनाने त्यावेळी लाॅकडावूनमूळे १०० कोटीच्या मागणीवर दि.२८ आॅगष्ट रोजी फक्त ३५ कोटी रु. एवढाच निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र अजूनपर्यंत उर्वरीत रक्कम पाठविलेली नसल्याने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अर्ज केलेले हजारो विद्यार्थी पैसे मिळण्यापासून वंचीत राहीलेले आहेत. यामूळे विद्यार्थी व पालकांना शैक्षणीकदृृृष्ट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या शैक्षणीक व कौटुंबीक भवितव्यावर याचा मोठा दुष्परीणाम होत आहे. याकरीता आपले स्तरावरून तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजीक न्याय विभाग, आयुक्त समाज कल्याण पुणे, तसेच अमरावती/औरंगाबाद/मुंबई/पुणे/नागपूर/लातुर/नाशीक येथील विभागीय उपायुक्त यांना पाठवील्या आहेत. त्यावर विभागीय उपायुक्त औरंगाबाद, नाशीक, नागपूर, अमरावती यांनी याबाबत आयुक्त पुणे यांना मागणी पत्र पाठवीले आहे. तसेच यांनी संबंधीत जबाबदार अधिकार्यांशी याबाबत यांनी मंत्रालयात भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधल्यानंतर. यामूळे याला वेग आला असून सामाजीक न्याय विभागाकडून तसा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविल्यानंतर सदर प्रस्ताव वित्त विभागात मंजूरीकरीता अंतीम टप्प्यात असल्यामूळे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना याची लवकरच रक्कम मिळणार असल्याचे मनवर यांनी सांगितले आहे.