Uncategorized

सेट-नेट परीक्षा पास होऊनही होत आहेत बेकारांच्या फौजा तयार

पुणे – ‘राज्यात वर्षानुवर्षे प्राध्यापक भरती बंद करून तासिका तत्त्वावर सेट-नेट पात्रताधारकाकडून काम करून घेऊन प्रचंड पिळवणूक सुरू आहे. त्यात परत प्रत्येक सेट-नेट परीक्षेत सहा टक्के जणांना पात्र ठरवून बेकारांच्या फौजा तयार केल्या जात आहेत. शासनाने तासिका तत्त्वावरील शिकवणे बंद करून १०० टक्के प्राध्यापक भरती सुरू केली पाहिजे; अन्यथा या असंतोषाचा उद्रेक होईल, अशा शब्दांत प्रा. प्रमोद तांबे संताप व्यक्त करत होते. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सेट परीक्षेचा निकाल कमीत कमी सहा टक्के लावण्याचा निर्णय केला. यामुळे २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांत ९ हजार ४८४ सेट पात्रताधारक तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील सुमारे १५ हजार प्राध्यापकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त जागा भरलेल्या नाहीत. पात्रताधारक सेटनेट प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करत असून, मार्च २०२०पासून महाविद्यालय बंद असल्याने त्यांच्या बॅंक खात्यात फुटकी कवडी देखील जमा झालेली नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी एका महिन्यात जाहिरात निघेल अशी घोषणा केली, परंतु त्यावर अजून काहीच झाले नाही. शासनाच्या धोरणामुळे गुणवत्ता असून देखील उपासमारीची वेळ आल्याने सेटनेट पात्रताधारक प्राध्यापक संतप्त झाले आहेत.

गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणात संशयितांवर आरोप निश्‍चिती 

‘राज्यातील सहायक प्राध्यापकांची संपूर्ण पदे पूर्ण क्षमतेने त्वरित भरली जावीत. तसेच सध्या प्राचार्य व प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची चर्चा सुरू आहे, परंतु त्यापेक्षा नोकरीचे २५ वर्ष किंवा वयाची ५५ वर्ष यापैकी जे लवकर पूर्ण होईल त्यानुसार सेवानिवृत्त द्यावी, त्यामुळे नवीन मुलांना संधी मिळेल. तसेच एमपीएससी, यूपीएससीच्या धर्तीवर जेवढे प्राध्यापक आवश्‍यक आहेत, तेवढेच पात्र केले जावेत. सध्या विद्यार्थी सेटनेट उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्‍यात जात आहेत. 
– प्रा. अजित दरेकर, अध्यक्ष, भारतीय इलिजिबल स्टुडंट, टीचर असोसिएशन (बीइएसटीए)

पुढच्या वर्षीपासून मराठीमध्ये 'लाॅ'

प्राध्यापकांच्या १५ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असतानाही पदभरती पूर्णतः बंद ठेवली आहे. तासिका तत्त्वावर काम देऊन सेट पात्रताधारकांच्या गळ्याभोवती घट्ट फास आवळला गेला आहे. शासनाने प्राध्यापक भरती त्वरित सुरू करावी, तसेच प्राध्यापकांना ‘समान काम समान वेतन’ द्यावे व परीक्षांचा पोरखेळ बंद करावा.
– प्रा. सुरेश देवढे पाटील, राज्य समन्वयक, नेट-सेट, पीएच. डी.धारक संघर्ष समिती

Edited By – Prashant Patil


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close