Uncategorized

शिरपूर येथील मनोज वाढे यांनि बनविलेल्या चप्पल व बुटांना बाजारपेठेत मागणी

आकर्षक व सुंदर चप्पल,बूट निर्मितीतून ग्राहकांना आकर्षण


गजानन देशमुख
शिरपूर ता 20 नोव्हेंबर
आधुनिकतेच्या काळामध्ये कारागिरांनी हातांनी बनविलेल्या वस्तू आज लोप पावत आहेत. सर्वच स्तरावर कॅम्पट्रायजेशन झाल्याने रेडिमेट म्हनजे तयार आकर्षक,डिझाइन असलेल्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.त्यामुळे उत्तम कॉलिटी असलेल्या कारागिरांनी हातांनी बनवलेल्या वस्तू आज लोप पावताना दिसत आहे.
येथील मनोज वाढे यांचा पूर्वीपासून चप्पल बूट बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु या आधुनिकतेच्या काळामध्ये या उद्योगावर पूर्ण मंदीचे सावट आले जुन्या पध्दतीच्या वस्तू लोकांच्या पसंतीला उतरत नसल्याने लोकांनी त्याकडे पाठ फिरवली होती .परंतु येथील कारागीर मनोज वाढे यांनी मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी जाऊन सुबक आकर्षक व नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली ,नवीन पद्धतीने आकर्षक रंगांमध्ये उत्कृष्ट डिझाईन कलाकुसर करून चप्पल व बूट त्यांनी बनविले . त्यामुळे परिसरामध्ये त्यांच्या चप्पल व बुटांना चांगलीच मागणी वाढत आहे.
जुनी कारागिरी लोप पावत असतांना त्यांनी आधुनिकतेचि जोड देऊन ग्राहकांच्या पसंतीची आकर्षक रंग, डिझाइन, व उत्तम दर्जेदार चप्पल ,बूट बनवून आपल्या व्यवसायातून प्रगती साधली आहे .यासाठी त्यांनी शहराच्या ठिकाणी जाऊन ही कला आत्मसात केली . आत्मविश्वास ,चिकाटी,परिश्रम या जोरावर त्यांनी आपला हा व्यवसाय यशस्वी केला आहे.काळ बदलत आहे त्याप्रमाणे बदल घडवून आणणे आवश्यक आहें .तरच या आधुनिकतेच्या व कॅम्पट्रायजेशनच्या युगामध्ये पारंपरिक व्यवसाय तग धरू शकतील अन्यथा जुनी हस्तकला लोप पावल्याशिवय राहणार नाही?त्यासाठी पारंपरिक कलेला आधुनिकतेचि जोड दिल्यास तोच व्यवसाय यशस्वी ठरेल .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close