शिरपूर जैन हागणदारी मुक्त? कि, युक्त !

आठवडी बाजारात उघड्यावर शौचास बसणार्यांचा हैदोस!

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
शिरपूर
शिरपूर येथील स्थानिक आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्याचा लिलाव करण्यात येते. तेथील ओट्यावर व परिसरांमध्ये नागरिक शौचास बसून असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे .
ग्रा.प.मार्फत लाखो रुपये खर्च करून आठवडी बाजाराला संरक्षित भिंत व ओट्याचे बांधकाम तसेच मांसविक्रेत्या साठी बांधकाम करण्यात आले होते, मात्र सद्या स्थितीत बांधकामाची पडझड झाली आहे.

आठवडी बाजारास संरक्षित भिंत आहे, मात्र गेट न बसवल्यामुळे मोकाट जनावरांचा मुक्त संचार आहे . मोठया प्रमानावर नागरिक तेथील ओट्यावर व परिसरामध्ये सौचास बसतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याठिकाणी घाण पझरली आहे. त्याच ठिकाणी दररोज भाजीपाला, फळांचा लिलाव करण्यात येतो घाणीवरचे जीवजंतू भाजीपाल्यावर बसत असल्याने व तोच भाजीपाला नागरिकांच्या आहारामध्ये जात असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाणे या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवावा अशी सुज्ञ नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे.
************************
शिरपूर व परिसरातील जनतेला आवाहन
ॲक्टीव्ह न्युज
ॲक्टीव्ह पोलीस टाईम्स आणि
दैनिक पुण्यनगरी
या न्युज पोर्टल व वृत्तपत्राच्या माध्यमातून शिरपूर शहरातील
रस्त्याच्या
सांडपाण्याच्या
अतिक्रमणाच्या
कचऱ्याच्या
आरोग्याच्या
दिवाबत्तीच्या
पाणी पुरवठ्याच्या
विज पुरवठ्याच्या व इतर
समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही माझे शिरपूर-माझी समस्या हे सदर सुरु करत आहोत.
या सदरा अंतर्गत तुमच्या वार्डातील,नगरातील समस्यावर आम्ही वृत्त मालिका प्रकाशित करणार आहोत.
तरी सर्व सामान्य नागरिकांना असलेल्या कोणत्याही समस्येची माहिती संबंधित नागरिकाने 8308444934 या क्रमांकावर vdo च्या किंवा माहितीच्या स्वरुपात पाठवावी.
आम्ही ती प्रकाशित करून आपल्या समस्येला वाचा फोडण्यासाठी ती समस्या सामायिक-सार्वजनिक करू.
तुम्हाला जर तुमचे स्वतःचे नाव उघड नसेल करायचे तर आम्हाला कळवावे आम्ही ते गुप्त ठेवू.
तरी शिरपूर व परिसरातील नागरिकांनी त्यांना लोकप्रतिनिधी कडून काही अपेक्षा असतील,काही सुचना सूचना करायाच्या असतील,काही तक्रारी असतील, इत्यादी आम्हाला पाठवा, सोबत एक फोटो आणि संक्षिप्त स्वरूपात माहिती टाइप करून पाठवावी.आम्ही आपली समस्या सोडवण्यासाठी निश्चित पुढाकार घेणार आहोत.त्यासाठी आपण सुद्धा बोलते होणे गरजेचे आहे.
सध्या आपल्या शहरात कोणतीच निवडणूक नाही. शिवाय ग्राम पंचायत मधेही कोणाचीच सत्ता नाही.
त्यामुळे न घाबरता आपणच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आवाज बुलंद करावा.तर लक्षात ठेवा——
माझे शिरपूर-माझी समस्या
व्हाटसॕप नंबर-8308444934