Uncategorized

विजेच्या अवाजवी बिलांबाबत सोमवारी भाजपा रस्त्यावर !

ग्राहकांचे समाधान न केल्यास ‘सळो की पळो’ करुण सोड़णार……

अॅक्टीव न्युज गजानन वानखेडे

तालुका प्रतिनिधी उमरखेड.

दिं.२१.११.२०२०.मों.९०९६७४६५१८…

विजदेयकात 30 टक्के कपात करण्याचे वचन दिलेल्या ठाकरे सरकारने आपला शब्द फिरवला आहे. ग्राहकांना संपूर्ण विजबिल भरावेच लागेल अशी स्पष्टोक्ति ऊर्जा विभागाने दिली, त्यामुळे सर्वसामान्य विजग्राहक हादरुन गेले आहेत, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कनखर भूमिका घेत राज्यभर तीव्र अंदोलनाचा पावित्रा घेतला असून, सोमवारी जिल्हाभर विज देयकाची होळी करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने विज बिलात सवलत देवून जनतेला दिलासा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा ईशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिला आहे.
यावर्षी बोगस बियाने, पावसाची दड़ी आणि पिक हाताशी आल्यानंतर परतीच्या पावसाने शेतकरी देशोधड़ीला लागला आहे. कोरोना महामारी आणि त्यात करण्यात आलेले लॉकडाउन यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. व्यापारी बांधव आणि अर्थव्यवस्था पुर्णतः मोडकळीस आली. अश्यात सरकारने विजेच्या बिलात सवलत देण्याच्या शब्दाला फिरवित सक्तीने वसुलीचे आदेश दिले. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली, लॉकडाऊन मुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलाचा शॉक दिला. त्यामुळे जनआक्रोश निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून, सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी विरोधीपक्ष म्हणून भाजपा रस्त्यावर उतरणार आहे. महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी, आर्थिक दुर्बल घटकातील 0 ते 100 यूनिट विज वापरणाऱ्या ग्राहकांचे 5 वर्षाचे बिल माफ करू ही घोषणा ठाकरे सरकारने पूर्ण करावी, सरासरी विजबिलात दुरुस्ती करावी, कोविड 19 काळातील मार्च, एप्रिल, में, जून या चार महिन्यांचे देयक माफ करावे, विज बिल माफिकरिता लागणारे सर्व अनुदान महाराष्ट्र शासनाने विज कंपनिला द्यावे आणि विजबिल 0 करावे या मागणीसाठी भाजपातर्फे सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राज्यभर वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा कुठल्याही ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करु देणार नाही. या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून सरकारने जनतेला त्वरित दिलासा न दिल्यास यापुढे उग्र आंदोलन करु आणि त्याची सर्वस्वी जबादारी सरकारची असेल असा ईशारा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिला आहे.

गजानन वानखेडे.तालुका प्रतिनिधी.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .