Uncategorized

वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन संपन्न

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक..२८/११/२०२०….प्रतिनीधी
मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालया मध्ये आज शनिवारी (ता.,२८) रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.लहासे सर यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डोंगरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डोंगरे सर म्हणाले कि, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महिलांसाठी असलेल्या “चुल आणि मुल” एवढेच मर्यादित न ठेवता, त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले,असे ते म्हणाले.
प्रा. लहासे सर यांनी सुध्दा महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.महात्मा फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.भगत सर ,प्रा. डाॅ. बोरचाटे सर,गणेश राऊत सर , संजय गांजरे, गजानन बाईस्कार इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.भगत मॅडम यांनी तर आभार प्रा.डाॅ. कडु सर यांनी मानले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .