Uncategorized

लोकसहभागातुन होणार पळशी मनुला पुलाचे बांधकाम

मुळावा गणाचे जि.प.सदस्य चितंगराव कदम सर यांचा उपक्रम

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634

मुळावा प्रतिनिधी-:

सकारात्मक विचाराची लोक एकत्रीत आली की त्यातुन नक्कीच चांगल्या बाबींना परिणाम देता येतो. त्यातलेच एक उदा. दयायचे झाल्यास पळशी ते मनुला दरम्यान असलेल्या पैनगंगा नदीवर लोकसहभागातुन पुलाची निर्मीती करण्याची संकल्पना जि. प. सदस्य चितांगराव कदम सर यांनी गावातील लोकांसमोर मांडली आणी मराठवाड़ा विदर्भातील अनेक नागरीकांचे हात या कामासाठी समोर आले. कोरोणाच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाकडुन नागरीकांच्या सुरक्षततेसाठी तीन व्यापक स्वरूपाचे लॉकडाऊन केले. यामध्ये संपुर्ण अर्थचक्र विस्कळीत झाले होते. पर्यायी आरोग्या विभागावर कोरोणामुळे आर्थीक बाबतीत प्राधान्य दिल्यामुळे विकास कामांचा वेग मंदावला. आशावेळी कुठलेही विकास काम करण्यासाठी सहजासहजी शासनाकडुन निधी मीळणे कठीनच झाले पर्यायी जि. प. सदस्य यांनी विकासकामात प्रभावी ठरणारी लोकसहभाग चळवळ गावातील नागरीकां सोबत उभी करून मराठवाड़ा विदर्भाला जोडणारा पळशी ते मनुला पुलाचे बांधकाम लोकसहभागातुन करण्याची संकल्पना पुन्हा एकदा सत्यात उतरवली. या आधी ही चितांगराव कदम यांनी तिवरंग ते तळणी, दिवटपींप्री ते साप्ती , काळेश्वर ते बिटरगाव , या ठीकानी लोकवर्गणी करत लोकांचा सहभाग घेत शासनाच्या अनुदाना शिवाय लाखो रूपयाची वर्गणी जमा करत लोकांनी मनावर घेतले तर कुठलेच काम आवघड नाही हे दाखवुन दिले.दिवाळीच्या मुहूर्तावर पळशी ते ,मनुला या ठिकानी लोकसहभागातुन पुलाचे बांधकामकरण्याचा संकल्प करण्यात आला.व मराठवाडा विदर्भाच्या परीसरातील गावातुन या कामासाठी लोकवर्गनी म्हणुन दहा लाख रूपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यानी दिली. यासाठी येत्या 20 ता. पासुन पैनगंगेच्या परीसरात सप्ताह चेही आयोजन करण्यात आले.अत्तापर्यंत एक लाख रोख, व अड़ीच लाख रू.येत्या दोन दिवसात लोकवर्गनीतुन जमा होणार असल्याची माहिती उपस्थीताकडुन मीळाली यावेळी. जी. प. सदस्य चितांगराव कदम, सुभाषराव कदम , सुदर्शन पाटील, गजानन पाटील, जामगडे सर , दिपक तेला, विश्वास जाधव , प.सदस्य गजानन सोळंकी, विश्वंभर कदम, श्याम कल्याणकर, दिपक बोरकर , प्रेमानंद कदम , व्यंकटराव कदम , श्यामराव कदम, शिवाजी महाराज इ. उपस्थीत होते.

SANDESH KAMBKE/ACTIVE NEWS NETWORK

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close