राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा सरचिटणीस पदी सुशांत जाधव

शिरपूर जैन सह जिल्हाभरातून सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत
शिरपूर जैन :
शिरपूर जैन येथील माजी सरपंच तथा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, प्रभावी व्यक्तिमत्व सुशांत (पाटील) जाधव यांची वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी सुशांत जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नियुक्तीचे शिरपूर जैन सह जिल्हाभरातून सर्वत्र स्वागत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुतीसाठी पक्षाच्यावतीने राज्य भरात कार्य हाती घेण्यात आले असून पक्ष वाढीसाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती देत पदोन्नती देण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाशिम जिल्हा सरचिटणीस पदी शिरपूर येथील युवानेतृत्व सुशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे . शिरपूर ग्रा.पं.चे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी तालुका उपाध्यक्ष, शिरपूर शहरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रथम अध्यक्ष सुशांत जाधव यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य व वर्चस्व तथा त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाअध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी सुशांत जाधव यांची पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती केली. वाशिम येथे झालेल्या पक्षाच्या एका खास कार्यक्रमात सुशांत (पाटील) जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
सुशांत जाधव यांच्या नियुक्ती वेळी संजय दहात्रे, जिल्हा विधी सेल अध्यक्ष अॅड.संतोष पोफळे, बबनराव चोपडे, सुबान रेघीवाले, सुरेश येवले, विष्णु राऊत आदीची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना रा.कॉ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी यावेळी पक्ष संघटनचे कार्य अधिक जोमाने करुन मा.शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागळापर्यंत पोहचविण्यात सर्व कार्यकर्त्यांनी कार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
सर्वांना सोबतघेवून काम करणार

पक्षाच्या नेत्यांनी ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकली, ती आपण सक्षमरित्या पार पाडू व काम करताना सर्वांना सोबत घेवून काम करु असे सांगतांना नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस सुशोत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबुत करणार अशी ग्वाही दिली.