Uncategorized

मोठी ब्रेकिंग ! विद्यार्थ्यांचीही आता ऍन्टीजेन टेस्ट; 'आरटीपीसीआर'मध्ये शिक्षक पॉझिटिव्ह

सोलापूर : शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांची 'आरटीपीसीआर' टेस्ट केल्यानंतर राज्यभरातील एक हजारांपर्यंत शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेत आता विद्यार्थ्यांचीही रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संबंधित शहर- जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्‍तांनी त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. आता पुढील आठवड्यापासून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शाळांबाहेरच ही मोहीम राबविली जाईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

 

स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन टेस्ट करावी
शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांचीही रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली जाईल. त्यासंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांनी स्थानिक पातळीवर घेणे अपेक्षित आहे.
– विशाल सोळंखी, शिक्षण आयुक्‍त

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांचे कुलूप 23 नोव्हेंबरपासून उघडले जाणार आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या राज्यातील 35 हजार शाळांचे वर्ग सुरु होतील. एक दिवसाआड चार तासांचे अध्यापन केले जाणार असून मोठ्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मर्यादा 50 टक्‍के ठेवली आहे. तत्पूर्वी, या वर्गांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जात असून आतापर्यंत पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार 261 शिक्षकांमध्ये सुमारे 30 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, सांगोला, मंगळवेढ्यासह अन्य तालुक्‍यांमधील शिक्षकांचा समावेश आहे. अद्याप कोरोनाची स्थिती सुधारली नसल्याने शाळेत येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची ऍन्टीजेन टेस्ट करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालक आणि शाळांचे विनंती अर्ज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपूर्द करुन विद्यार्थ्यांची ऍन्टीजेन टेस्टची मागणी केल्याची माहिती सोलापूरचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

शाळा सुरु करण्यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण सूचना…

  • एकूण शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्‍केच असावी उपस्थिती
  • एक दिवसाआड चार तासांचे असावे अध्यापन; इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांना द्यावे प्राधान्य
  • शाळा दोन शिफ्टमध्ये असावी; शिफ्ट निवडण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना
  • सकाळी साडेसात ते साडेअकरा व दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच भरतील वर्ग
  • एका वर्गात 20 विद्यार्थी बसतील; एक दिवसाआड विद्यार्थ्यांना करावे अध्यापन
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शाळांबाहेरच घ्यावी रॅपिड ऍन्टीजेन टेस्टची मोहीम

Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close