Uncategorized

मुळावा परीसरात खडकमाफीयांचा हौदोस

महसूल विभागाच्या नाकावर टिचून

जेसीपी द्वारे हजारो ब्रास मुरमाचे उत्खणन

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो. 9503151634
दि. 23/11/2020

मुळावा प्रतिनिधी-: दिवसंदिवस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तांत्रिक युगात वाढत असुन , पर्यावरणा ऱ्हास कमी करण्यासाठी शासनाकडुन वेळोवेळी योग्य त्या उपाय योजना केल्या जातात. परंतु रेतीपाठोपाठ आता मोठ्या प्रमाणात गौण खणिजाचे हजारो बास चे उत्खणण जेसीपी व्दारे राञीच्या आंधारात उघड पने केल्या जात असतांना महसुल प्रशासन मुग गिळुन गप्प का असा प्रश्न प्रत्यक्षदर्शी नागरीकांना पडत आहे. परीसरात, रस्ते, व खाजगी बांधकामे मोठ्या प्रमानात चालु असुन खडक व रेतीचा वापर होतो आहे. एका खाजगी व्यक्तीने नुकतेच तहसीलदाराकडुन 50 ब्रास खडक तरोडा येथुन मुळावा येथे आणन्याची परवानगी मिळवली, परंतु प्रत्यक्षात मात्र शासनाचे सर्व नियमांची पायमल्ली करत खडकमाफीयाकडुन सुकळी नविन या परीसरातुन हजारो ब्रास खडकाची तष्करी केल्या जात असुन शासनाचा लाखो रूपयाचा महसुल खडक माफीया, रेतीमाफीयाकडुन बुडवला जात आहे. अवैध्यरीत्या खडकाचे उत्खनन करत असतांना जेसीपी व्दारे आवतीभवतीच्या झांडांचेही बळी घेतल्या जाऊन पर्यावरण विघातक वर्तन खडक माफीयाकडुन केल्या जात आहे. तेव्हा उमरखेड येथे नव्यानेच रूजु झालेल्या तहसीलदाराचे काम या अधिच्या नियुक्ती ठिकानी हे नियमांच्या चाकोरीत व पारदर्शक होते. हिच भुमीका घेत . उमरखेड तहसीलदार परीसरातील खडक माफीया व रेतीमाफीयाच्या मुसक्या आवळत . झालेल्या हजारो ब्रास खडक उत्खणननात पडलेल्या खोल गड्याचे चौकशी दरम्यान मोजमाफ करून दंडात्मक कारवाई करतील का आसा प्रश्न जनतेला पडला आहे.

SANDESH KAMBLE/ACTIVE NEWS NETWORK

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .