मुळशीतील 'निसर्ग'ग्रस्तांना केवळ 15 हजारांची मदत ; भांबर्डे ग्रामस्थांचे तहसिलदरांना निवेदन
मुळशी ः मुळशी तालुक्यातील भांबर्डे गावातील आंबेडकर नगर, एकोले, रामवाडी येथील घरांचे जून महिन्यात आलेल्या निसर्गचक्रीवादळात प्रचंड नुकसान झाले होते. गावातील 184 कुटुंब या वादळाने बाधित झाली होती. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातील झालेल्या नुकसानीमुळे लोकांनी कर्ज काढून पुन्हा घरे उभी केली. सरकार मदत करेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र नुकतीच नुकसानग्रस्तांची मदत यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सर्वच नुकसाग्रस्तांना केवळ 15 हजाराची तुटपुंजी मदत देण्यात आली आहे. ही मदत आहे ही आमची चेष्ठा. अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे
…तर आत्महत्या करण्याची वेळ
भांबर्डे गावातील नागरिकांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नुकसानीच्या मानाने सरकारने दिलेली मदत ही खुपच तुटपुंजी आहे. घर पुन्हा बांधण्यासाठी दीड लाखापेक्षा अधिक खर्च झाला. ते पैसे आम्ही व्याजाने घेतले आहेत. ते परत केले नाहीत तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात सरकारने मदत करावी.
बेस्टला केलेल्या मदतीचा हिशोब घेऊन पुढील मदत करणार: मुंबई पालिका
सरकारच्या नियमा प्रमाणे नुकसानानी पाहणी करुन अहवाल सरकारला देण्यात आला होता. सरकारच्या नियमाप्रमाणे घराच्या चारही भिंती पडल्या आणि संपुर्ण घर कोसळले असेत तर दीड लाख रुपयांची मदत मिळते. भांबर्डे गावात 12 जणांना ही मदत देण्यात आली आहे. तर घराचा एक पत्रा उडाला असेल किंवा सर्वच पत्रे जरी उडून गेले असले तरी 15 हजाराची मदत करण्यात आली आहे.
– गणेश पोतदार, तत्कालीन तलाठी, भांबर्डे गाव
सरकराने दिलेल्या मदतीपेक्षा खुप जास्त आमचे नुकसान झाले आहे. सरकाने तत्काळ आम्हाला वाढवून मदत द्यावी.
– अशोक मोरे, भांबर्डे
वादळाने आयुष्याची कमाई आणि डोक्यावरचं छप्पर अवघ्या काही मिनिटात गेलं. गावतील मंदिरात काही दिवस आसरा घेतला. सरकार मदत करेल या अपेक्षेने कर्ज काढून पुन्हा घर उभ केलं. घराच्या उभारणीस एक लाखापेक्षा जास्त खर्च आला. मात्र आता सरकारने चार महिन्यांनी 15 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आम्ही जगावं की नाही.
– गणेश यादव, आंबेडकर नगर, भांबर्डे
Only fifteen thousand rupees aid to nature hurricane victims in mulshi
Source link