बनावट ‘सातबारा’ करणाऱ्यांचे वाजले ‘बारा’
पुणे – राज्यातील जवळपास दीड कोटी सातबारा उताऱ्यांत बदल करण्यात आले आहेत. त्यावर आता सरकारचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे. त्यामुळे बनावट सात-बारा तयार करून फसवणूक करणाऱ्यांना चाप बसला आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्याच्या अनेक भागात अद्यापही जमिनींच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा वापरला जातो. बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-विक्री करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहे. सरकारी भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णयास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. राज्यात सुमारे २ कोटी ५३ लाख सातबारा उतारे आहेत. त्यापैकी जवळपास दीड कोटी सातबारा उताऱ्यात बदल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या बदललेल्या स्वरूपातील सातबारा उतारा नागरिकांना आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे राज्याचे ई-फेरफार प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले.
Corona Update – पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक
असा असेल बदल
- आता गाव नमुना सातबारा व ८ (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र सरकारचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क
- गावाच्या नावासोबत एलजीडी कोड (लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी) कोड
- लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार
- शेती क्षेत्रासाठी ‘हे.आर. चौ.मी.’ आणि बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर.चौ.मी.’ हे एकक दर्शविले जाणार
- खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार
- मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात येणार
Edited By – Prashant Patil
Source link