Uncategorized

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

कपिल भालेराव

शिरपुर (विशेष प्रतिनिधि) :- गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या आहेत .
वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या आहेत .यामुळे तूर ,हळद , फळबाग सारख्या पिकावर प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताअधिक झाली आहे. त्यामुळे या पिकांना ढगाळ वातावरणाचा फटका बसत असल्याने आनखी एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे .वाशीम जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक शेतकरी घेत असतात .या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंग माशी , शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग याचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे .तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीच्या पीकावर कीड रोगांना आमंत्रण देणारे ठरते आहे. हे सध्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळी, शेंग माशी यांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत आहे ,रोगांना पोषक वातावरण आणखी काही काही दिवस कायम राहिल्यास पिकांना फार मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी पट्टा पद्धतीने अथवा खंड पद्धतीने केल्यास परोपजीवी कीटकांच्या संवर्धनात मदत होते. त्याकरिता शेतकरी वेळोवेळी तूर पिकाचे निरीक्षण घेऊन शेंगा पोखरणारी अळी ची अंडी सारख्या किडीचा प्रादुर्भाव दिसतोय का याची खातरजमा करावी व आर्थिक नुकसान पातळीच्या आधारावर ईमामेक्टीन बेंजोईट 5% , एस .जी. 2.5 ते 3 ग्राम ,हे 10 लिटर पाणी प्रमाण घेउन आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी असा सल्ला डॉक्टर राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी दिला आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close