जिव्हाळ्याची पाठशाला उपक्रमा अंतर्गत शालेय साहित्य वाटप

गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप
संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634
मुळावा प्रतिनिधी :- इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्थेने उमरखेड येथे
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वितरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने सर्वकाही सामसूम आहे. कोरोनाच्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्राथमिक शिक्षण ऑनलाइन प्रणालीद्वारे देण्याचा प्रयोग शहरी आणि ग्रामीण भागात सुरू आहे. परंतु झोपडपट्टीत राहनारे, उसतोड कामगारांची मुले, पाल्वस्त्यांतील लोकांची मुले आदिवासी विध्यार्यी या सारखे अतिशय गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याबाबतची गोडी आणि अभिरुची दिवसेंदिवस कमी होत आहे. मुळात हीच बाब लक्षात घेऊन जिव्हाळा संस्थेने उमरखेड येथे शालेय साहित्या मध्ये वही,पेन, खोडरबर, पेन्सिल, उजळणी चे पुस्तक आदी साहित्याचे वाटप उमरखेड पंचायत सामिती चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षण घेण्यासाठीची जिद्द निर्माण व्हावी आदी बाबत सातत्यपूर्णता राहावी हीच भावना यामागे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार यांनी यावेळी सांगितले व विशेषतः उसतोड कामगारांची मुले, झोपडपट्टीत राहनारी मुले, पाल्वस्त्यांतील लोकांची मुले, या सारख्या मुलांचे शिक्षण शैक्षणिक साहित्या अभावी थांबले जाऊ नये या करीता जिव्हाळा संस्था जिव्हाळ्याची पाठशाला या उपक्रमा द्वारे लोकसहभागातून मागील सहा महिन्यापासून शालेय साहित्य वाटपाचे कार्य सातत्याने सुरु आहे. यामुळे अनेक गरीब गरजू होतकरू विध्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत आहेत त्यांना मिळणाऱ्या या छोट्याश्या शालेय साहित्या मुळे त्यांच्या जीवनात जिव्हाळयाचा आनंद निर्माण होत आहे. आई वडील ऊस तोडीचे काम करत असतांना याच उसाच्या फडावर त्यांची मुले अभ्यास करतांना पाहून आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे स्मित हस्य फुलत आहे ते मनोमनी समाधानी होऊन जिव्हाळा संस्थे चे आभार मानत आहेत. अश्यातच उमरखेड पंचायत सामिती चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांनी वाढदिवसा निमित्य जिव्हाळा संस्थेस जवळपास दोनशे विध्यार्थ्यांना पुरेल एवढे शालेय साहित्य दान करून मदतीचा हातभार दिल्याने साहित्य वाटप करण्यात आल्याचे जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष यांनी सांगितले व त्यांचे जिव्हाळा संस्थे च्या वतीने आभार मानले. यावेळी उमरखेड पंचायत सामिती चे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ गांजेगावकर, शहारुख पठाण, जिव्हाळा संस्थे चे सल्लागार सदस्य प्रदीपजी पिंपरखेडे, शिवा भाऊ, जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार स्वयंसेवक विजय राठोड, रोहित अलमुलवार उपस्थित होते.
SANDESH KAMBLE/ ACTIVE NEWS NETWORK