जिव्हाळ्याची उपेक्षितांन सोबत दिवाळी

गोड दिवाळी स्तुत्य उपक्रम
संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634
मुळावा प्रतिनिधी:-
चलो जलाये खुशियो के दिप वहां …
जहां आजभी अंधेरा है… या पंक्तीना प्रत्यक्ष कार्यात उतरवत
इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्थे ने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिव्हाळ्याची गोड दिवाळी एक हात मदतीचा हा समाज स्तुत्य उपक्रम उमरखेड तालुक्यातील गरजू ,उपेक्षित वर्गा सोबत यंदा ही दिवाळी साजरी करत आहेत .आपण आपल्या मुलाबाळांसह आपल्या संपूर्ण कुटुंबा सोबत अत्यंत आनंदाने ही दिवाळी साजरी करत असतो .पण आपल्या अवती,भोवती असा पण एक उपेक्षित, गरजू घटक राहतो की रोज आपल्या कुटुंबाचा गाडा हा रोज मजुरी करून हकलतअसतो. त्यांना पण अशाच आनंदाची गरज असते पण त्यांची परिस्थितीही आडवी येते पण अशा उपेक्षित घटकांना पण हा आनंद मिळावा म्हणून जिव्हाळ्याची गोड दिवाळी ह्या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू उपेक्षित लोकांना मुलांना कपडे, किराणा राशन आणि फराळ इत्यादी साहित्य हे त्यांच्यापर्यंत लोकसहभागातून पुरवल्या जात आहे. ह्या उपक्रमाला लोकसहभागातून पण भरपूर प्रमाणात मदत मिळत आहे व या उपक्रमामुळे उपेक्षित गरजू लोकांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य फुलले आहे या उपक्रमासाठी जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार, प्रदीप पिंपरखेडे, अरविंद वोझलवार, शैलेश असोले, श्रीकांत शहा, विजय राठोड आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे या उपक्रमाचे सर्व स्तरातून तोंड भरून कौतुक होत आहे.
SANDESH KAMBLE/ ACTIVE NEWS NETWORK