Uncategorized

चंद्रभागे तीरी नाही वैष्णवांची मांदियाळी! तेथे होती केवळ निरव शांतता…. (VIDEO)

पंढरपूर :  कोरोना संसर्गामुळे कार्तिकी वारी रद्द करण्यात आली. संचारबंदी लागू केल्याने पंढरीला छावणीचे स्वरुप आले आहे. येरवी टाळ मृदंगाने गजरात दणाणून जाणारा चंद्रभागा तीर आज सुन्न झाला होता. वैष्णवभक्तीअभावी  चंद्रभागा आज पोरकी झाली होती. तेथे होती केवळ निरव शांतता….  पंढरपुरातील. कोरोनामुळे कार्तिकी वारी रद्द केली. कोणालाही पंढरपुरात प्रवेश नाही. परिणामी चंद्रभागा तिरावर शुकशुकाट आहे. टाळ मृदंगाच्या गजराने दणाणून जाणारे वाळवंट आज सुन्न होता.
 
गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी निर्बंध टाकले होते. मार्चमध्ये लॅाकडाऊन झाल्याने सर्व मंदिरे बंद होती. यात्रा जत्रा रद्द करण्यात आल्या. एवढेच नाही तर आषाढी वारीही मोजक्या वारक-यांच्या उपस्थितीत पार पडली. आषाढीमध्ये पायी वारीला सरकारने बंदी घातल्याने संत ज्ञानेश्वर महाराज  व संत तुकाराम महाराजांच्या यांच्यासह अन्य मानाच्या संतांच्या पादुका वीस वारक-यांच्या उपस्थितीत पादुका एसटीमध्ये पंढऱपूरमध्ये नेण्यात आल्या. तेव्हाही संचारबंदी होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आजही सरकार खबरदारी घेत आहे.

राज्याला चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचे बळ दे! अजित पवारांचे पांडुरंगासमोर साकडे

लोकांशी निगडीत अनेक स्तरावर सरकारने लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्या. राज्यभरातून मंदिर उघडण्यासाठी आग्रह झाला. आणि गेल्या आठवड्यात राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खूली करण्यात  आली. त्यामुळे पंढरपूरातील आजच्या कार्तिकी वारीबद्दल वारक-यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने निर्बंध कायम ठेऊन प्रातिनिधीक वारी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंदिरात पहाटपूजेसह नैमित्यिक कार्यक्रम झाले. वारीत चंद्रभागेवर जाणारे सर्व घाट बंद करण्यात आले होते. वारक-यांना नित्यनेमासाठीही घाटावर प्रवेश बंदी होती. परिणामी चंद्रभागा घाटावर आज निरव शांतता पाहायला मिळाली. 

 

मोजक्या वारक-यांत प्रदक्षिणा
कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा महत्वाची मानली जाते. प्रशासनाने पहाटे चार ते सकाळी सात या वेळेत दहा वारक-यांच्या दिंडीला प्रदक्षिणा करण्यास परवानगी दिली होती.  त्यानुसार पहाटे चारपासून दिंड्यांची प्रदक्षिणा सुरू झाली होती. भजनाचा ठेक्यात अभंग म्हणत परंपरेप्रमाणे वारक-यांनी प्रदक्षिणा पू्र्ण केली.

कडेकोट पोलिस बंदोबस्त
पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केल्याने शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परवानगी दिलेल्या वारकरीच प्रदक्षिणा करताना दिसत आहेत. पंढरपूरकर ग्रामस्थांनी घरात राहणेच पसंत केले. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. इंद्रायणी घाट तसेच विठ्ठल मंदिर परिसरात जाण्यास कोणासही परवानगी नाही. पंढरपूरला छावनीचे स्वरुप आले आहे. 

मंदिरांमध्ये गजर
पंढरपूरमधील मंदिरांमध्ये नैमित्यिक धार्मिक उपक्रम सुरू आहेत. संत ज्ञानेश्वर मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, संत नामदेव महाराज मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये कार्यक्रम सुरू होते. वारीच्या सर्व परंपरा जपत काकड आरती, भजन, कीर्तन मोजक्या वारक-यांमध्ये सुरू होते. मात्र, पंढऱपुरातील विठ्ठल मंदिरासह सर्व मंदिरे दर्शनसाठी बंद आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती.
 
 


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .