Uncategorized

कृषी दूताने जांब आढाव गावामधील लोकांच्या समस्यांचे केले निवारण

रिसोड:
कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यातील दरवर्षी गावामधील चालणारी कामे स्थगित पडल्यामुळे गावातील रस्त्याच्या कडेची नाली उपसा व दुरुस्ती तसेच जि.प. प्रा. शाळेतील परीसराचे कुंपण व रस्ता दुरुस्तीचे कामे खंडित पडल्यामुळे पावसाळ्यात गावातील लोकांना याचा त्रास जाणवू लागला आहे.
यावर सुविदे फाउंडेशन कृषी महाविद्यालय रिसोड मधील अंतिम वर्षाचा विद्यार्थी नितीन सुरेश वाघ याने गावातील लोकांच्या सर्व समस्यांचा आढावा घेऊन या समस्या गावातील शारदा संतोष आढाव ( सरपंच), उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच गावातील वरिष्ठ मंडळी व शेतकरी वर्गासोबत
दि.८ सप्टेंबर २०२० रोजी बैठक घेऊन या समस्या सविस्तर मांडल्या. या सर्व समस्या सरपंच,पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनी लक्ष्यात घेऊन सर्व अडकलेली कामे लवकर योग्य रित्या चालू करू असे आश्वासन दिले आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले. यावेळी रामदास वाघ,ज्ञानेश्वर वाघ,सतिष वाघ,सुधाकर अढाव, बाबुराव अढाव,गोपाल वाघ, राहुल वाघ व अन्य गावकरी मंडळी उपस्थित होती.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. अप्तुलकर सर,प्रा.आर.सरनाईक सर,तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.डी.मसूडकर सर व प्रा.खोडके सर यांचे मार्गदर्शन लाभले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .