Uncategorized

उमरखेड महागाव विभागाचे लोकनेते माजी आमदार अँड. अनंतरावजी देवसरकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

जनतेचा आधारवड कोसळला
अॅक्टीव न्युज गजानन वानखेडे

तालुका प्रतिनिधी उमरखेड.दिं.२७.११.२०२०.मो.९०९६७४६५१८…………………
दि. 26 नोव्हेंबर
उमरखेड-महागाव विभागाचे लोकनेते तथा विधानसभेचे माजी आमदार तद्वतच यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. अनंतरावजी देवसरकर साहेब यांचे आज सकाळी दि. २६/११/२०२० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
दि. १ जुलै १९३६ रोजी देवसरी तालुका उमरखेड येथे त्यांचा जन्म झाला. देवसरी येथेच १९४२ ते ४५ पर्यंत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्यानंतर १९४६ ते ५५ पर्यंत उमरखेड येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. शालेय जीवनात विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी लक्षणीय होती. क्रीडा, वक्तृत्व व अभ्यासात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते. त्यानंतर १९५५ ते ५७ या काळात अमरावती येथे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शिक्षण छात्रसंघाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्य केले आहे तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला होता. १९५७ ते ६१ मध्ये त्यांनी नॅशनल कॉलेज व हिस्लॉप कॉलेज नागपूर येथून बीएची पदवी प्राप्त केली. १९६१-६२ दरम्यान त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यानंतर १९६२-६५ विधी महाविद्यालय नागपूर येथून एल एल बीची पदवी प्राप्त केली. याच काळात ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९६५ पासून त्यांनी पुसद येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. १९६६ मध्ये अखिल भारतीय कुर्मी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नागपूर विद्यापीठावर निवड झाली. १९७२-७६ दरम्यान ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष होते.१९७४ मध्ये त्यांनी युरोपियन राष्ट्रांचा दौराही केला होता.१९७७ मध्ये ते पुसद सूतगिरणीचे अध्यक्ष होते. उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल हैदराबाद येथे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान कृषी विद्यापीठाचे सदस्य व नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. १९७८ मध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांची ही कारकीर्द लक्षणीय ठरलेली आहे. १९८३- ८४ मध्ये ते पुसद बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९८६ ते ९२ या काळात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी, ता. उमरखेडचे ते संचालक होते. त्यानंतर १९९२ मध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची अविरोध निवड झाली. १९९३ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालय नागपूरच्या अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड झाली. १९९५ ला वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. उत्कृष्ट प्रशासक , शिस्तप्रिय राजकारणी , एक तत्वज्ञ , शब्दाला जागणारा व दिलेला शब्द पाळणारा राजकीय नेता म्हणून ओळख असलेले वकील साहेब , शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारे त्यांचे कार्य यवतमाळ जिल्हा कुणबी समाज संस्थेच्या शैक्षणिक संकुलाच्या रूपाने जिल्हाभर पाहायला मिळतात . १९९९ साली उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. २००१ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन जनतेने स्वंयस्फुर्तिने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते नागरी सत्कार घडवून आणला . असे अजातशत्रु नेतृत्व आज काळाच्या पडदयाआड गेले .# गजानन वानखेडे तालुका प्रतिनिधी उमरखेड.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close