Uncategorized

हाथरस येथे झालेल्या हत्याकांडातील गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी वाशिमच्या वतीने राष्ट्रपती ला पाठविले निवेदन….

Active News Network
दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२०
वाशिम/ प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडातील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळावा व गुन्हेगाराला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा यांच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम द्वारा मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवण्यात आले .
मनीषा वाल्मिकी च्या गुन्हेगाराला कडक शिक्षा द्यावी व उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावं असा उल्लेख निवेदनात केला आहे.
वंचित बहुजन आघाडी चे महासचिव सिद्धार्थ देवरे साहेब, जिल्हा अध्यक्ष रवींद्र देशमुख , जिल्हा प्रवक्ता सुभाष अंभोरे, जिल्हा सचिव पी. यु. चक्रनारायन, प्रसिद्धी जिल्हा अध्यक्ष अजित गवई , जि.उपाध्यक्ष रंगनाथ धांडे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, गोविंदराव इंगळे, माधव महाजन, गिरीधर शेजोळ, दिलीप भगत, गोवर्धन राऊत, डॉ. रवींद्र मोरे, संतोष सरकटे, समाधान भगत, प्रमोद लळे, सोनाजी इंगळे, संजय काळे, छत्रपती गायकवाड, किरण ताई गिरे, आणी इतर सभासद हजर होते .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close