Uncategorized

सोशल डिस्टिंसिंग चे नियम पाळून अंबाळी येथे देवदर्शन…..


गजानन वानखेडे.अॅक्टीव न्युज
तालुका प्रतिनिधी उमरखेड.
दिं.०१.१०.२०२०.
मो.९०९६७४६५१८.
……………………………..
उमरखेड तालुक्यातील मौजे अंबाळी येथे आज ऊरीच्या पोर्णिमेनिमित्त देवदर्शन सोशल डिस्टिंसिंग चे नियम पाळून, तोंडाला मास्क बांधून, मंदिरात नेहमी प्रमाणे ठीक बारा वाजता आरती पार पडली.
नेहमीच मंदीराच्या सभागृहात आरती पार पडत असते,पण आज मंदीरातच आरती म्हणण्यात आली.कोरोना महामारी संकटामुळे संपूर्ण जग अडचणीत सापडले आहे.शासकीय सर्व नियम पाळून देव दर्शन घेतले.धोंड्याच्या अधिक मासातील पोर्णिमा निमित्त आज धोंडे वाहण्यासाठी भक्त अंबाळी येथे आले.
बारा खांडी पैकी प्रसिद्ध असलेली अंबाळीचे बाबा नावाने ही खांडी ओळखली जाते, महानुभाव पंथाचे बाबा,आई येथे देवदर्शन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात, मुक्कामाला मोठे सभागृह आहे तसेच आणखी दोन सभागृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
मंदिराला चहू बाजूंनी घनदाट सागवान वृक्षांचा वेढा असलेल्या नैसर्गिक वातावरणात रमनीय अंबाळीचे बाबा देवस्थान संस्थान आहे.दरवर्षी येथे जानेवारी महिन्यात रोट चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.पण,ऊद्याचा नवरात्र उत्सव सुद्धा रद्द करण्यात आला अशी सुचना भिमराव पाटील चंद्रवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी सुचनेद्वारे आज सांगितले.सर्व भक्त देवदर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
कोरोनाचे संकट लवकर जाण्यासाठी देवाला जणू साकडे घालत असावेत.दर पोर्णिमेला येथे अन्नदान, महाप्रसाद असतो. आज महाप्रसाद खिचडी भजे,व धोंडे वितरण करण्यात आले.मंदीरात पिण्यासाठी पाणी सुविधा उपलब्ध आहे.
भक्ताचे मनोगत:-आम्ही नियमीत दर पोर्णिमेला देवदर्शन करण्यासाठी येत असतो,येथील मंदिर विकासाच्या दृष्टीने शासनाने निधी देऊन सहकार्य करावे,तसेच अंबाळी फाट्यापासून मंदीरापर्यंत रस्ता खड्डेमय झाल्यामुळे वाहतूक,प्रवासी यांना त्रास होत आहे,तरी शासनाने सुखकर प्रवास होण्यासाठी त्वरीत नविन रस्ता करून द्यावा… महेश दत्ता आगलावे मरसुळकर.

गजानन वानखेडे.

तालुका प्रतिनिधी उमरखेड.

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close