Uncategorized

सिमेंटच्या जंगलात लुप्त होतोय सुगरणीचा खोपा

सातगाव पठार –  “अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला, अशा शब्दांत सुगरणीच्या कौशल्याला शब्दबद्ध करणाऱ्या ग्रामीण कवयित्री बहिणाबाई यांच्यामुळे सुगरणीचा खोपा सर्वत्र परिचित आहे. मात्र, ग्रामीण भागांतील विहिरींमध्ये तसेच झाडांवर दिसणारे सुगरण पक्षाचे तसेच इतरही पक्षांची घरटी आता काळाच्या ओघात लुप्त होऊ लागल्याची खंत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाढत्या नागरिकरणामुळे सर्वत्र सिमेंटची जंगले उभी राहू लागली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नैसर्गिक सृष्टी सौंदर्य लोप पावत चालले असून पशू-पक्ष्यांची घरटी देखील दिसेनाशी झाली आहेत. एकेकाळी पहाटे विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने नागरिक झोपेतून जागे व्हायचे. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागातही सिमेंटच्या इमारती मोठ्या संख्येने उभ्या राहत आहेत. पूर्वीसारखे दिसणारे पक्ष्यांचे थवेदेखील आता क्वचितच नजरेस पडतात. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पूर्वीच्या काळी विहिरींच्या आजूबाजूला झाडे मोठ्या प्रमाणावर बहरलेली असायची. पक्षी देखील आपले घरटे पाणवठ्याची जागा शोधूनच शेजारी बहरलेल्या झाडांवर आपली घरटे बनवायचे. मात्र, आता पाणवठे देखील कमी झाल्याने त्या ठिकाणांची झाडे देखील कमी झाली. त्यामुळे पक्षी आता आपली घरटे बनविण्यासाठी काळानुरूप जागा बदलत आहेत. 
– राजकुमार डोंगरे, पर्यावरण अभ्यासक, खोडद (ता. जुन्नर) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


Source link

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close