Uncategorized

(शिरपूर जैन) शेतकऱ्यांच्या नावावर निवडून आलेले स्थानिक पुढारी कोमात;

शेतकऱ्यांच्या हितासाठी अ.भा.भ्रष्टाचार समितीचा पुढाकार

मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या व शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची निवेदनातून केली जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिरपूर जैन/ प्रतिनिधी (किशोर देशमुख)

शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

शिरपूर जैन व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे अतिवृष्टीने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु स्वयंघोषित असलेल्या शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांचे हे नुकसान दिसत नाही. फक्त निवडणुकीच्या वेळी “ब*राजा” म्हणून बिरूद लावून मिरवायचे आणि त्याच शेतकऱ्यांच्या मतावर निवडून यायचे. नंतर त्याच शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष ढुंकूनही पहायचे नाही. गल्ली पासून वरील सर्व पदे ताब्यात असूनही अशा ढोंगी पुढाऱ्यांना किती वेळा निवडून द्यायचे, आणि कशासाठी हे आता शेतकऱ्यांनी विचार पूर्वक ठरवायला हवे.

सोयाबीन हे आमच्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. हे पीक हाता तोंडाशी आले असताना अतिवृष्टीमुळे या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. बरीचशी कापलेली सोयाबीन ओली झाली. बहूतांश सोयाबीनचे उभे पीक शेतात पावसात भिजत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब आले आहेत. अनेक शेतात सोयाबीनच्या गंज्या (ढीग) ओल्या झाल्या आहेत. वातावरणातील ओलाव्यामुळे काढलेली सोयाबीन निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यामुळे अत्यंत कमी दराने ती सोयाबीन विकावी लागत आहे. शेतात सोयाबीनचे कुटार भिजल्यामुळे भविष्यात गुराढोरांच्या चारा-वैरणीचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय अतिवृष्टीमूळे तुरीचे पीक उध्वस्त झाले आहे. सततच्या पावसामुळे हळद पीकावर करपा पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतजमिनीचा वरचा सुपिक थर खरवडून गेला आहे. सोबतच आमच्या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव न करता मातीमोल दराने सोयाबीनची राजरोसपणे खरेदी सुरु आहे. अस्मानी संकटाने झोडपलेला शेतकरी असा सुलतानी संकटात भरडला जात आहे. अशावेळी एक लोकनियुक्त सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.परंतु तसे होतांना दिसत नाही जनतेने निवडून दिलेले लोक प्रतिनिधी यांना मात्र शेतकऱ्यांच्या किंवा स्थानिकांच्या प्रश्नांकडे वेळ नसून ते आपल्यास पिल्यांना मोठ करण्यात गुंग आहेत.

आमच्या मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे व शेतमालाचे बांधावर जाऊन पंचनामे झाले पाहिजे. पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आपण उपलब्ध करुन दिली पाहिजे. आगामी आॕक्टोबर संपण्याच्या अगोदर नुकसानीचे पंचनामे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत झालीच पाहिजे. अन्यथा आगामी निवडणूकांत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी वाशीम यांच्या मार्फत मा.उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य-मुंबई -मा.अजितजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री,महाराष्ट्र राज्य-मुंबई – मा.दादाजी भुसे साहेब,कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य-मुंबई यांना दिले आहे सदर निवेदनावर किशोर प्रकाशराव देशमुख (मालेगाव तालुका उपाध्यक्ष, अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती दिल्ली)- अमोल शंकरराव देशमुख (मालेगाव तालुका सरचिटणीस, अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती दिल्ली) , संदीप त्र्यंबकराव देशमुख (शिरपूर शहराध्यक्ष, अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती दिल्ली)आणि इतर शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close