Uncategorized

शिक्षकांना शाळेत येण्याची सक्‍ती नकोच ! शासन आदेशाचे उल्लंघन केल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई

सोलापूर : कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने शिक्षक घरबसल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. तरीही काही शाळा शिक्षकांना आठवड्यातून एक-दोनदा हजेरीसाठी बोलावत आहेत. त्यामुळे शिक्षकांना मोठा खर्च करुन यावे लागत असून, त्यांना कोरोना संसर्गाची भिती आहे. मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये काही शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शाळांना शिक्षकांना हजेरीची सक्‍ती करु नये. हजर न राहिल्यास वेतन कपात करु नये आणि ऑनलाइन शिक्षणाशिवाय कोणतीही परीक्षा आयोजित करु नये, असे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढले आहेत.

 

विभागीय उपसंचालकांच्या आदेशानुसार…

  • 24 जूनच्या आदेशानुसार शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत
  • शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर भर; शिक्षकांना हजेरीसाठी शाळांत बोलावू नये
  • हजेरीवर स्वाक्षरी न केल्याच्या कारणावरुन कोणाचेही वेतन अडवू नये
  • दूर अंतरावरून येणाऱ्या शिक्षकांचे हाल; कोरोना संसर्गाचीही त्यांना भिती
  • परीक्षा तथा चाचणी आयोजनाचे शासनाचे कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने ऑनलाइन शिक्षणाशिवाय तसा प्रयोग नकोच
  • शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ऑनलाइन कर्तव्य काळ ग्रहित धरुन त्यांना वेतन अदा करावे
  • शासनाच्या आदेशाचे उंल्लघन केल्यास संबंधित शाळांमधील मुख्याध्यापकावर केली जाईल जबाबदारी निश्‍चित

 

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण देत असतानाही शाळांच्या हट्टापायी शिक्षकांना नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड अशा दूर ठिकाणाहून तीन ते चार हजारांचा खर्च करुन यावे लागत आहे. दुसरीकडे लोकल ट्रेन बंद असल्याने त्यांना खासगी वाहन करुन शाळेत यावे लागत आहे. याबाबत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळांसाठी स्वतंत्र पत्र काढले. त्यानुसार त्यांनी शिक्षक तथा कर्मचाऱ्यांचा ऑलाइन कर्तव्यकाळ ग्रहित धरून कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये, असे आदेश दिले. तर 24 जूनच्या शासनाच्या परिपत्रकानुसार अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करावे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्‍चित करुन कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

परीक्षांबाबत लवकरच निर्णय
कोरोनामुळे शाळा सुरु करण्याबद्दल अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, राज्यभरातील मुलांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत नियोजन सुरु आहे. त्याबद्दल काही दिवसांत निर्णय घेऊन शाळांना कळविला जाईल. तुर्तास परीक्षा घेण्याबाबत शाळांना कोणतेही आदेश दिलेले नाहीत.
– दिनकर पाटील, संचालक, शालेय शिक्षण


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close