Uncategorized

विदर्भातील शिक्षकाचे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन!

व्हर्च्यूअल क्लासव्दारे केले इंग्रजीत पारंगत;गावकर्‍यांनी केले सत्कार

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634

मुळावा प्रतिनिधी :-:कोरोनामुळे अध्ययन—अध्यापन प्रक्रीयेला ब्रेक लागला असला तरी प्रयोगशिल व उपक्रमशिल शिक्षकाने यावर मात करीत व्हर्च्यूअल क्लासव्दारे ज्ञानार्जणाचा मार्ग निवडला असून विदर्भातील एका शिक्षकाने चक्क मराठवाड्यातील विद्यार्थ्याना आधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इंग्रजी विषयात पारंगत केल्याने गावकर्‍यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

कोरोना या महामारीमुळे मार्च महिण्यापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिण्यात शाळांचा सत्रारंभ झाल्यानंतर ज्ञानार्जणाला सुरवात होईल या अपेक्षेत विद्यार्थी व पालक होते परंतु या दरम्यान राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने दिवाळी पर्यंतही शाळा सुरु होणार नसल्याचे शासनाकडून कळविण्यात आले.दरम्यान राज्यातील अनेक शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांना युट्युब चॅनल,व्हाट्सएप,झूम ऍप आदींचा वापर करुन शैक्षणिक प्रवाहात ठेवण्याचे काम केले आहे.तर उमरखेड पंचायत समितीतील तरोडा जिल्हा परिषद केंद्रातील पोफाळी गावचे सुपुत्र व वसंतनगर शाळेतील खुर्शीद पठाण यांनी आपल्या शाळेतील सहावी ते आठवीतील चाळीस नाही तर चक्क मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल क्लासच्या माध्यमातून इंग्रजी विषयात पारंगत केले आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून ते ग्रामीण भागात इंग्रजी विषयाचे ज्ञान जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भिती घालविण्याबरोबरच त्यांचा पाया परिपक्व करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद विद्यार्थी मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडून ज्ञानदान घेणारे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. खुर्शीद बी.पठाण ह्यांनी आपल्या कर्तुत्वातून जिल्हा शिक्षक व राज्य शिक्षक पुरस्कार मिळविण्याबरोबरच जागतिक कान्फर्रन्समध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे.त्यांनी दूर्गम म्हणून ओळख असलेल्या उमरखेड तालुक्यातील अंबाळी,जनुना,वसंतनगर, पोफाळी आदी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब विद्यार्थीना अस्खलित इंग्रजी मधून संभाषण करण्याची कला शिकविली असून अनेक राज्यस्तरीय अधिकार्‍यांनी त्यांच्या शाळांना भेटी देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. व हाडाचे शिक्षक म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे.कोरोनामुळे शाळा बंद असली तरी त्यांनी शाळेतील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन द्वारे इंग्रजी शिक्षण देत दिवाळी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील साप्ती येथील काही पालकांनी त्यांची भेट घेऊन आमच्या मुलांना व्हर्च्यूअल क्लासव्दारे इंग्रजी शिकविण्याचे साकडे घातले.पालकांच्या विनंतीनुसार त्यांनी दररोज एक ते दिड तास याप्रमाणे एकोणपन्नास दिवसांमध्ये कधीही न पाहीलेल्या विद्यार्थ्यांना झुमअॅपव्दारे इंग्लीश स्पिकींग, ग्रामर, इंट्रोडोक्शन, कन्हर्रसेशन, इंटरीव्ह, रायटींग स्कील आदींमध्ये पारंगत केले असून इंग्रजी विषयाचे ज्ञान अवगत केल्यामुळे त्यांच्या करिअर मध्ये बदल झाल्याने पालकांनी त्यांना आपल्या गावी बोलवून गावचे माजी सरपंच तथा हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी कदम,सरपंच व्यंकटराव कदम, उपसरपंच शामराव कदम, पोलीस पाटील कबीरदास कदम, दत्‍तराव कदम, दयानंद कदम, रामेश्र्वर कदम, निळकंठ कदम, मिलिंद खंदारे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खुर्शिद पठाण यांचा डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकोणपन्नास दिवस घेतलेल्या ज्ञानाचे सर्वांच्या उपस्थितीत प्रदर्शन केल्यानंतर गावकर्‍यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन कदम,अमोल कदम,गंगाधर खंदारे यांनी पुढाकार घेतला.यावेळी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजीराव कदम संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,हदगाव जि.नांदेड
शिक्षक के.बी.पठान ह्यांच्या इंग्रजी विषयावरील प्रभुत्वाची विदर्भासह मराठवाड्यात सुद्धा चर्चा असल्याने लाॅकडाऊन दरम्यान आमच्या गावातीलज विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्याची केल्यानंतर माणूसकीच्या नात्याने त्यांनी तब्बल एकोणपन्नास दिवस दररोज एक ते दिड तास अध्यापन करुन आमच्या मुलांना इंग्रजी विषयात पारंगत केले.

SANDESH KAMBLE

ACTIVE NEWS NETWORK

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close