रिसोड तालुक्यात गाव तिथे अधिकारी ही मोहीम
Active News Network
रिसोड: प्रतिनिधी
दिनांक: २६ ऑक्टोबर २०२०
काल अशोका विजयादशमी, व ६४वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन गोवर्धन सर्कल येथे साजरा करण्यात आला , या विजयादशमीच्या पावन पर्वावर सावित्रीबाई महिला मंच या सामाजिक महिला संघटनेने विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरू करून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केले , या अभ्यासिकेच्या गोवर्धन सर्कल मधील स्पर्धा परीक्षाप्रेमी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे यांनी स्वखर्चातून या अभ्यासिकेला स्पर्धापरीक्षा पुस्तके भेट दिली.
काल ह्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या अभ्यासिकेचे उदघाटन किरणताई गिर्हे यांच्या हस्ते झाले.
उडघटनाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख उपस्थित होते .तसेच वंचित चे रिसोड तालुकाध्यक्ष अकिल भाई , धांडे साहेब, भारतीय बौध्द महासभेचे पोफळे सर वंचित चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अजित गवई व इतर पदाधिकारी उपस्थित होते . गोवर्धन सर्कल येथे ज्या सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे काल उदघाटन झाले, तशाच स्पर्धा परीक्षा पूर्ण गावागावात तयार करू व गाव तिथे अधिकारी ही मोहीम राबवू अशे वंचित च्या प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे यांनी काल झालेल्या कार्यक्रमात म्हटले आहे.
वंचित चे जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख यांनी म्हटले की बहुजन वर्ग हा खूप कष्टाळू आहे , अभ्यासु आहे पण आर्थिक परिस्थितीत कुठे तरी थोडा कमी पडतो. तर त्यांनी आता जिद्दीने पेटून उठायचं आहे या अध्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धेची तयारी करायची आहे , काही मदत लागल्यासआम्ही वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून मदत करू असे आश्वासन दिले.
