Uncategorized

महाराष्ट्रातून लवकरच मॉन्सून परतीला 

पुणे – गुजरात आणि मध्य प्रदेशातून परतीच्या मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण  तयार होत आहे. त्यामुळे लवकरच राज्यातूनही परतीच्या मॉन्सूनचा मुक्काम हलणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता येत्या चोवीस तासांत कमी होणार असून, उत्तर आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण ओडिसा यादरम्यान सरकेल. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला माघार घेण्यासाठी आणखी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातूनही वेगाने मॉन्सून सरकण्याची शक्‍यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला असून, राज्यातील अनेक भागांत वादळी वारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 
उत्तर भारतात पावसाने उघडीप दिल्याने हवेतील ओलावा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात चढउतार सुरू आहेत. पश्‍चिम 
राजस्थानमधील चुरू येथे 40.7 अंशसेल्सिअस, तर पूर्व राजस्थानात भिलवरा येथे 17.7 अंश सेल्सिअसच्या सर्वांत कमी तापमानाची नोंद झाल्याचे हवामान 
विभागाने सांगितले. 


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close