मनीवाईज वित्तीय साक्षरता केन्द्र व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी
Active News /02/10/20
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा
कारंजा-दिनांक ०२आक्टोंबर २०२० महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनीवाईज तालुका समितीय अध्यक्ष गजानन नेमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून मनिवाईज तालुका समीतीय उपाध्याक्ष ललिता तायडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे च्या समतादूत प्रणिता दसरे, तर पाहुणे म्हणून आमंत्रित मनीवाईज तालुका समितीय सदस्य आशा अंबाळकर, एन आय आर डी वैशाली गुळघाण, पंचायत समिती कारंजा च्या संगीता राजगुरू आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर समतादूत प्रणिता दिनेशचंद्र दसरे यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.सदर कार्यक्रमाला मनीवाईज वित्तीय साक्षरता केन्द्र क्षेत्रीय समन्वयक माधवी सरकटे, मनीवाईज वित्तीय साक्षरता केन्द्र तालुका व्यवस्थापक श्याम ठाकरे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.