मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा नुकसान संदर्भात अर्ज सादर करा

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक….२७/१०/२०२०….प्रतिनीधी
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील सोयाबीन पिक नष्ट झाले आहे.मंगरुळपीर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिक विमा भरला आहे.अश्या शेतकरी बांधवांनी पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात तालुका कृषि आधिकारी मंगरुळपीर यांच्याकडे 2 दिवसाच्या आत अर्ज सादर करावे असे आवाहन शिवसेनेचे मंगरुळपीर तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांनी आज (ता.27) रोजी केले आहे.शिवसेनेच्या लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी यांनी पिक विमा कंपनी यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली,आणि आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला होता,या अनुषंगाने खासदार भावनाताई गवळी यांच्या मागणीला यश आले असुन शेतकऱ्यांनी पिक विमा नुकसान संदर्भात अर्ज सादर करण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांनी केले आहे