बार्टीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम
Active News/01-10-20
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा
कारंजा-दिनांक ०२ आक्टोंबर २०२० रोजी बार्टीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती बार्टीचे कारंजा तालुका समतादूत प्रणिता दिनेशचंद्र दसरे यांनी झूम अँपच्या माध्यमातून ऑनलाईन साजरी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रणिता दसरे यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जीवनकार्य विषयी माहिती दिली.त्यावेळी या दोन महान नेत्यांच्या जिवनातील काही प्रसंग सांगून त्यांच्या कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प अधिकारी वाशिम जिल्हा वसंत गव्हाळे यांनी महात्मा गांधी केलेली सत्याग्रह चळवळ व त्यांचे अहिंसा विषयी कार्य तसेच त्यांच्या सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावार्डीचे मुख्याध्यापक विजय भड यांनी आॅनलाईन शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात,त्याचबरोबर लालबहाद्दूर शास्त्री यांचे जीवनकार्य याविषयी माहिती दिली.कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून लाभलेले समाजसेवक संजय कडोळे यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या,तसेच वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधी बार्टीला शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगरूळचे समतादूत तुकाराम वनारसे, तर आभार शेगावचे समतादूत शुभांगी सरकटे यांनी केले. सदर कार्यक्रमाला जि.प ज्युनिअर कॉलेज मंगरूळ च्या प्रा.सविता मोरे,बी एम एम उमेद अभियान च्या वर्षा ठाकरे,मनीवाईज वित्तीय साक्षरता केन्द्र क्षेत्रीय समन्वयक माधवी सरकटे, समतादूत कृष्णा आलनकर, आशिष इंगोले उपस्थित होते.
सदर कार्यक्रम झूम अँप च्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री ना धनंजय मुंडे, राज्यमंत्री डाॅ विश्वजीत कदम, सचिव पराग जैन-नैनुटिया, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये समतादूत मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे अमरावती विभागाचे साह्य प्रकल्प संचालक राहुल कराळे वाशिम,बुलढाणा जिल्हा प्रकल्प अधिकारी अँड वसंत गव्हाळे आदींच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला.