Uncategorized

पोलिसानेच केला घटस्फोटित प्रेयसीवर बलात्कार, मुख्यालयतून अटक

नागपूर : नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित करतेवेळी मोबाईलने फोटो आणि ब्ल्यू फिल्म तयार केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलिस कर्मचाऱ्याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. 

विक्रमसिंग जगतसिंग बनाफर (वय ३०,  रा. नर्मदा कॉलनी, फ्रेण्ड्स कॉलनी) असे अटकेतील पोलिस शिपायाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. पोलिस कर्मचारी सध्या पोलिस मुख्यालयात तैनात आहे. २०१६ मध्ये तो पोलिस दलात दाखल झाला. तत्पूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करीत होता. याच कंपनीत पीडित ३३ वर्षीय महिला काम करते. 

जाणून घ्या – चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक् 
 

ती घटस्फोटित असून, तिला एक मुलगा आहे. अंबाझरी परिसरात एकटी राहते. पोलिस दलात भरती झाल्यानंतर विक्रमसिंग याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. २०१७ मध्ये पीडित महिलेला घेऊन तो बेलतरोडीतील श्रीकृष्णा एनक्लेव्ह येथे राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटवर आला. तिथे तिला नाश्त्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाली तिच्यावर अत्याचार केला.

याची मोबाइलद्वारे चित्रफितही काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेचे शोषण करायला लागला. सहा महिन्यांपूर्वी विक्रमसिंग याचे लग्न झाले. लग्नानंतर तो महिलेला आणखी त्रास द्यायला लागला. त्रास असह्य झाल्याने महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून विक्रमसिंग याला अटक केली.

संपादन  : अतुल मांगे  


Source link

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close