Uncategorized

नवरात्री उत्सव निमित्त भक्तांसाठी, माननीय मंत्री श्री. प्रकाशभाई मेहता यांच्या संकल्पनेतून श्री. स्वामी समर्थ मठा मध्ये राबविण्यात येते विविध कार्यक्रम.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

श्री स्वामी समर्थ मठ, पंतनगर घाटकोपर पूर्व मुंबई, येथे उपरोक्त मठाची स्थापना २०१३ मध्ये विभागातील निवृत्त पोलीस कर्मचारी कार्यालयाच्या जागेवर झाली. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माननीय श्री प्रकाशभाई मेहता यांच्या संकल्पनेतून सदर ठिकाणी एक सुबक अशा वास्तूमध्ये उत्तम अशा उभारणी झाली. सदर ठिकाणी निवृत्त पोलीस कर्मचारी व काही स्वामी भक्त यांच्या मध्ये समन्वय साधून एक अधिकृत अशी कार्यकारणी स्थापन करण्यात आली.

सदर कार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील स्वामी भक्तासाठी जप तप ध्यान केंद्र सुरु करण्यात आले. तसेच वाचनालय हि सुरु करण्यात आले. अक्कलकोट स्वामी समर्थ मठात होणारे विविध कार्यक्रमा प्रमाणे सर्व धार्मिक विधी सदर मठामध्ये सुरु करण्यात आले.

सदर मठामध्ये चित्रकार माजी नगरसेवक श्री सुरेश गोलतकर यांनी रेखाटलेले श्री दत्तात्रयाचे सुंदर असे तैलचित्र लावण्यात आले आहे. सुंदर अशी संगम्रावाराम्ध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. सुरवातीला श्री दतात्रय यादव यांच्या अध्यक्ष खाली श्री लोटणकर, श्री. किरण प्रभू ,प्रभाकर अंगाने,आनंदराव शिंदे,अजय बागल, रश्मीन समेळ, राजेश म्हामुणकर, गोविंद वाळके, चंद्रकांत गुजर, रमेश पांडे, आनंद वारीक,चंद्रकांत क्षीरसागर, बाबू दरेकर , बाळ (प्रकाश) गोलतकर अशे अनेक स्वामी भक्त अहोरात्र मेहनत करून सदर मठ चालवत आहेत.

दरवर्षी ३ मे रोजी मठा मध्ये महाराष्ट्र राज्य वर्धापनदिन साजरा केला जातो. यावेळी समस्त जनतेसाठी स्वामी भंडारा आयोजित केला जातो, तसेच मठातून स्वामी पादुकांची भव्य मिरवणूक पंतनगर विभागातून काढली जाते, सदर मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होतात.
दरवर्षी गुरुपोर्णिमा, श्री स्वामी प्रकट दिन, तसेच नवरात्र निमित स्वामिंना भवानी मातेच्या स्वरुपात शृंगार केला जातो, महाआरती, जागर, भजन, कीर्तन व भक्तांसाठी प्रसाद दिला जातो. अशा प्रकारे विविध कार्यक्रम मठात साजरे केले जातो.

आज भाविक जनतेसाठी श्री स्वामी समर्थ मठ हे एक धार्मिक पुण्यस्थळ म्हणून विख्यात झाले आहे दूरदूर वरून अनेक भाविक मठात श्री स्वामी समर्थ यांचे पुण्यादर्शन घेण्यासाटी येत असतात. नुकतेच मठाचे नूतनीकरण करण्यात आले, यासाठी भक्तांनी सढळ हस्ते मदत केली. नेहमीप्रमाणे माननीय श्री प्रकाशभाई मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक नगरसेविका सौ. राखी जाधव सालियन यांचीही मदत वेळोवेळी होत असते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close