Uncategorized

तलाठी कार्यालयाच्या बांधकामाच घोड अडलं

मुळावा येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाला
मुहुर्त कधी मिळणार


   
निधी उपलब्ध असून सुद्धा बांधकाम का होत नाही..?
जि. प. सदस्य चितागंराव कदम

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634

मुळावा प्रतिनिधी:-मुळावा सारख्या लोकसंख्येने अधिक असलेल्या गावात  तलाठी कार्यालय बांधण्यात आले नाही . पर्यायी स्थानिक मुळावा येथील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाला मुहुर्त कधी मिळणार असा सवाल विभागाचे जि. प. सदस्य चितांगराव सर यांनी उपस्थीत केला आहे.             मुळावा ह्या ठिकाणी एक वर्षा पूर्वी शासनाने तलाठी कार्यालया करिता निधी मंजुर केला पंरतु आज पर्यत तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले नसल्या मुळे  तलाठी कार्यालयावर अखर्चीक निधी अखेर नेमका कुठ खर्च केला , असे प्रश्न निर्माण होत आहे.  अखेर इथला निधी अन्य इतर कामावर  खर्च करण्यात आला का? आणि  कोणत्या कारणामुळे खर्च करण्यात आला.  असे अनेक प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत.   शेतकरी व सर्व सामान्य नागरीकांना महसुल विभागाच्या सुविधा विनाअडथळा व कमी वेळात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत एक  वर्षा पूर्वी मुळावा येथे .तलाठी कार्यालया साठी निधी मंजुर   करन्यात आला होता. परंतु आजमीतीला  दोन हजार वीस ही  संपत  आले असतांना   तलाठी कार्यालयाचे बांधकाम  पुर्ण करण्यात आले नाही   , पर्यायी  ग्रामपंचायतीच्या दुकान गाळया मध्ये  तातपुरत्या स्वरूपात तलाठी कार्यालयाचे कामकाज  चालु आहे. तरी संबधीत यंत्रनेने  मुळावा या गावातील तलाठी कार्यालयाचे रखडलेल्या बांधकामाचा शुभारंभ करून त्वरीत तलाठी कार्यालयाचा प्रश्न मार्गी लावावा . अशी मागणी जी. प. सदस्य चितांगराव कदम सर यांनी केली आहे.

SANDESH KAMBLE/ACTIVE NEWS NETWORK

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close