Uncategorized

जिव्हाळा संस्थे मध्ये; वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुणे दिन संपन्न

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634

मुळावा प्रतिनिधी:- सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्थेने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून 15 ऑक्टोबर निमित्य तालुक्यातील मुळावा येथे अहिल्यादेवी होळकर सभागृहात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुणे दिन साजरा करण्यात आला या वेळी डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन स्व. पी. एल. सिरसाट प्रणीत ग्रामीण पत्रकार संघ मुळावा चे अध्यक्ष गजानन पवार व पत्रकार प्रदीप बारहाटे तसेच गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी तसेच युवकांनी सहभाग घेऊन विविध पुस्तकांचे वाचन केले आणि नियमित वाचनाची शपथ घेतली या वेळी संस्थे च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण पत्रकार गजानन पवार व प्रदीप बारहाटे यांच्या हस्ते करण्यात आले विध्यार्थ्यांनी डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भाषण, गायन कथा कथन या सारख्या विविध स्पर्धान मध्ये सहभाग घेऊन आपले विविध कौशल्य सादर केले संस्थे ने कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या व प्रशासनाच्या सर्व नियमाचे पालन करून शारीरिक व सामाजिक अंतर ठेऊन विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला. शाळा बंद असल्यामुळे विदयार्थी घरी आहेत, संस्थे च्या या उपक्रमा मुळे त्यांना नवचेतना मिळाली.
तसेच जागतिक हात धुने दिवस कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शासन व प्रशासन नियमित आपणा सर्वाना मार्गदर्शन करत आहे हात धुणे कितीगरजेचे आहे. या उदेशाने विध्यार्थ्यांना व गावकऱ्यांना हात कसे धुवावे, कधी धुवावे आणि किती वेळा धुवावे याचे संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले आणि सर्व विध्यार्थ्यां कडून हात धुणे प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाचे संचलन जिव्हाळा संस्थे चे स्वयंसेवक शंकर जोगदंड यांनी केले तर आभार विजय बेदरे यांनी मानले. या वेळी शुभम भोने, प्रदीप जामकर हे उपस्थित होते.

SANDESH KAMBLE

ACTIVE NEWS NETWORK

Cheaf Editor

Chief Editor and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close