Uncategorized

गोगरी येथील नवयुवकांचा वृक्ष लागवड एक संकल्पना या उपक्रमाची सुरुवात…

नवनाथ गुठे/चोरद/दिनांक….२४/१०/२०२०……प्रतिनीधी
चोरद येथुन जवळच असलेल्या गोगरी येथील नवयुवकांनी “वृक्ष लागवड एक संकल्पना” च्या माध्यमातुन वृक्ष लागवडीस केली सुरुवात यानुसार येथील तरुणांनी “वृक्ष लागवड एक संकल्प” या ग्रुपच्या वतीने त्यांनी सोशलमिडीयाच्या माध्यमातुन आपल्या अनोख्या उपक्रमास सुरुवात केली.गोगरी येथील स्वर्गीय अंकित मसवडकर यांना जेव्हा शेलुबाजार येथील आरोग्य वर्धनी केंद्रात जेंव्हा ऑक्सीजनची नितांत गरज असतांना त्या रुग्णाला ऑक्सीजन होऊ शकत नव्हतं याच गोष्टीची दखल घेत येथील तरुण युवकांनी विचार केला असता आपल्याला वृक्ष किती मोठ्या प्रमाणात प्राणवायु देतात हिच संकल्पना गोगरी येथील तरुण-जेष्ठ मंडळी यांनी एक संकल्प हाती घेतलेला आहे.वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून कुठलाही व्यतिरिक्त खर्च न करता वाढदिवसानिमित्त प्रत्येकास एक वृक्ष भेट देण्याची सुरुवात केली आहे.यानुसार वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष भेट दिल्या जातो तो त्यांनी संगोपन करण्यासाठी संकल्प करुन घेतल्या जात आहे.या उपक्रमासाठी विकास कोंंगे,गणेश बोथे, राहुल साखरे, नंदु जाधव, अनिल टोंचर,आकाश बोथे, महेंद्र सावके, वैभव बोथे, अमोल कंकणे, दीपक जाधव, शाम बोथे, गौरव चौधरी, मुरलीधर बेंगाळ, गोपाल कुटे, विजय जाधव, वैभव महल्ले, चेतन बोथे, अभिषेक सावके, शुभम निघोट, प्रल्हाद शिंदे, नागेश बोथे, निलेश मसवडकर, प्रशांत शेगोकार, हरीष, मसवडकर, संदीप बोथे, ज्ञानेश्वर काळे, पप्पु साखरे, रवी काळे, हनुमान कोंगे, राहुल इंगोले,वैभव मोहळे,इत्यादी सदस्यांच्या साह्याने ते उपक्रम राबवित आहेत.

गोगरीसह परिसरातील नागरिकांनी वृक्ष विषयक लागवडीसह संगोपनासाठी किंवा माहितीसाठी आम्ही ग्रुपच्या माध्यमातुन कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांना वृक्षलागवड संकल्प ग्रुप ची सर्व सदस्य टीम कटिबद्ध आहे.
विकास कोंगे.मो.नंबर ७६२०३६७४६३.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close