कारंजा नगरीचे आराध्य दैवत श्री कामाक्षा देवीचा शारदीय नवरात्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यात्रा व भाविकांच्या गर्दीला प्रतिबंध
Active News/13-10-20
एकनाथ पवार ता.प्र.कारंजा
कारंजा ( लाड ):- कारंजा नगरीचे आराध्य दैवत व कारंजेकरांची कुलस्वामीनी श्री . कामाक्षा देवीच्या शारदीय श्री . नवरात्रोत्सवाला दि . १७ ऑक्टोंबर २०२० पासून प्रारंभ होत असून श्री . नवरात्रोत्सवात दरवर्षीप्रमाणे पारंपारिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण भारतात श्री . कामाक्षा देवीचे दोन च ठिकानी शक्तिपिठं आहेत . त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी . व दूसरे म्हणजे विदर्भ राज्याच्या वाशिम जिल्हयातील पावित्र शक्ती पिठं कारंजा नगरी होय . श्री . कामाक्षा माता ही नवसाला पावणारी, मनोकामना पूर्ण करणारी जागृत देवी म्हणून ओळखल्या जाते . या मंदिराचा कारभार महाजन कुटूंबीयांकडे आहे . या वर्षी मार्च २०२० पासून को व्हीड १९ कोरोना महामारीने कहर माजवी ला असून त्यामुळे श्री . कामाक्षा माता संस्थान कारंजाने आपल्या दरवर्षीच्या परंपरेला फाटा देत श्री . कामाक्षा देवी संस्थान कारंजा येथील ऐतिहासिक व पारंपारिक यात्रा रद्द केलेली असल्यामुळे या वर्षी यात्रा भरणार नाही . ( कारंजाच्या इतिहासात श्री. कामाक्षा देवीची यात्रा प्रथमच रद्द करण्यात आली आहे . ) याची व्यावसायीक व भाविकांनी नोंद घ्यावी . तरी भाविक श्रीदेवी उपासकांनी आपआपल्या घरी राहूनच श्री . कामाक्षा मातेचे नामस्मरण, जप, भजन , आरती करण्याचे संस्थानतर्फ सुचविण्यात आले आहे . तसेच मंदिरामध्ये कृपया कोणीही गर्दी करू नये . मुखाच्छादन म्हणजेच मास्क बांधूनच व सामाजिक अंतर ठेवूनच मंदिराचे दूरदर्शन घ्यावे . व कोणीही प्रसादाचे वितरण करू नये असे सुध्दा श्री . कामाक्षा माता मंदिराकडून कळविण्यात आलेले आहे . त्याचप्रमाणे संस्थानचे शारदिय श्रीनवरात्रोत्सवातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील . दि .१७ ऑक्टोबर२०२० वार शनिवार रोजी श्रीदेवीचा मंगलाभिषेक व घटस्थापना . दुपारी०३:०० वाजता ह . भ .प. संजय म . क डोळे यांच्या जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजा यांचा गोंधळ जागरण कार्यक्रम .दिः२१ ऑक्टोंबर२०२० बुधवारला षष्ठीचा जोगवा . श्री . कामाक्षा माता गोंधळी कला संच . श्री . ज्ञानेश्वर वि . क डोळे यांचा जोगव्याचा कार्यक्रम . वेळ:- रात्री ०७:३० वाजता . दिः २३ ऑक्टोंबर २०२० शुक्रवार दुपारी०२:०० वाजता श्री . स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत उपासकांचे सप्तशती पाठ . व रात्री ०९:०० वाजता महाअष्टमीचा होमहवन व पूर्नाहूती व दिपमाळ प्रज्वलन कार्यक्रम व महाआरती . दि२५ ऑक्टोंबर २०२० रविवार रोजी विजया दशमी निमित्त सकाळी महाभिषेक, जगदंबेचा शृंगार व सिमोलंघन होऊन . दि .३० ऑक्टोबर२०२० पोर्णिमेला शुक्रवारी कार्यक्रम सांगता होईल . श्री . देवी नवरात्रोत्सवात मोजक्याच पुजारी, गोंधळी, व मानाच्या भक्त मंडळींमार्फत च दररोज दुपारी १२:०० व रात्री ०७:०० वाजता महाआरती होईल . भाविकांची गर्दी टाळण्याकरीता भक्त मंडळीनी सर्व कार्यक्रमाची नोंद घेवून दक्षता घेण्याचे आवाहन श्री . कामाक्षा देवी संस्थानकडून – ह . भ . प . श्री . दिगंबर पंत महाजन महाराज यांचेकडून करण्यात आले आहे .